Published On : Sat, Aug 18th, 2018

महाराजबागेतील अनामिकेचा मृत्यू

Advertisement

नागपूर : महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील १० वर्षीय माता बिबट ’अनामिका’ हिचा शनिवारी सकाळी आजारपणात मृत्यू झाला. महाराज बाग प्राणिसंग्रहालय परिसरातच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ती तीन महिन्याची असल्यापासूनच महाराज बागेत राहत होती. त्यामुळे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी तिचे अतूट नाते जुळले होते. दोन महिन्यापूर्वीच वाघिण जाई हिचा मृत्यू झाला, आणि आता अनामिकेच्य मृत्यूमुळे येथील डॉक्टर आणि कर्मचारही स्तब्ध आहेत.

जून २००९ मध्ये भिवापूर येथील कोलारी गावातील शेतकरी नत्थुजी वैरागडे यांच्या उघड्या विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडले होते. माहिती मिळताच तत्कालीन सहायक वनसंरक्षक सुनील ओहोळ यांनी घटनास्थळी जाऊन त्या छोट्याश्या बिबट्याच्या पिल्लाला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले होते. या अपघातात त्या मादा बिबट्याचे काही हाडं तुटले होते.

त्यामुळे त्याला महाराज बागेत उपचारासाठी ठेवण्यात आले होते. येथे उपचारानंतर त्याला वाचवण्यात आले. परंतु पाठीवर जखम असल्याने सातत्याने उपचार सुरु होते. त्यामुळे ‘अनामिकेला’ डिस्प्ले मध्ये न ठेवता. मागच्या पिंजºयात ठेवण्यात आले होते. महाराज बागेतच या बिबट्याच्या पिल्लाला अनामिका हे नाव मिळाले.

महाराज बागेतील सूत्रानुसार मागील आठ दिवसंपासून अनामिकेची प्रकृती खराब होती. परंतु शनिवारी प्रकृती अधिकच बिघडली. दुपारी १२.३० वाजता तिचा मृत्यू झाला. व्हेटरनरी डॉ. सोनकुसरे यांनी पोस्टमार्टम केल्यानंतर दुपारी ३.३० वाजता महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. बावस्कर आणि इतर पदाधिकारी व अधिकाºयांच्या उपस्थितीत अनामिकेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.