Published On : Wed, Oct 11th, 2017

महानगरपालिकेच्या दहाही झोनमध्ये १२ ऑक्टोबरला महिला उद्योजिका मेळावा

NMC Nagpur
नागपूर:
नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागाद्वारे महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून दहाही झोनमध्ये महिला स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला सक्षम व स्वयंरोजगारनिर्मित तयार करण्यासाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. १२ व १३ ऑक्टोबर दरम्यान हा मेळावा घेण्यात येत आहे. मेळ्याव्याचे उद्‌घाटन लक्ष्मीनगर झोन कार्यालय येथे सकाळी १०.३० वाजता महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. धरमपेठ झोनमध्ये सकाळी ११ वाजता उद्‌घाटन होईल. याप्रसंगी महिला व बाल कल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, उपसभापती श्रद्धा पाठक, उपायुक्त रंजना लाडे हे उपस्थित राहतील. या मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.