Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Aug 19th, 2017

  महेश मांजरेकरांचा ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ चित्रपट येतोय, अनेक दिग्‍ग्‍ज कलाकार एकत्र

  मुंबई : मुंबईतील दादर पश्चिमेचा पिनकोड क्रमांक ४०००२८ आहे. पण थोडक्यात सांगताना तो २८ असाच नमूद केला जातो. तमाम मुंबईकरांचे अभिमानबिंदू असलेले अजून एक ठिकाण म्हणजे शिवाजी पार्क. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, शिवसेना, मनसेची स्थापना ते क्रिकेट अशा अनेक विषयांनी वलयांकित असलेल्या शिवाजी पार्कवर आता दिग्दर्शक महेश मांजरेकर हे “शिवाजी पार्क मुंबई २८’ हा चित्रपट बनवत आहेत.

  १९८९ मध्ये सचिन पिळगावकर यांनी “आत्मविश्वास’ चित्रपटाचे चित्रीकरण शिवाजी पार्क आणि दादरचा समुद्रकिनारी केले होते. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आलेल्या चित्रपटाचे चित्रीकरणही येथे करण्यात आले होते. अलीकडेच मांजरेकरांनी “शिवाजी पार्क मुंबई २८’ हा चित्रपट तयार करण्याची घोषणा केली. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, अशोक सराफ, सतीश आळेकर, शिवाजी साटम, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, सविता मालपेकर, सुहास जोशी आणि भारती आचरेकर, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दीप्ती लेले, मंजिरी फडणीस यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्ये म्हणजे एकाच वेळी दिग्गज कलाकार एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाचे लेखन अभिराम भडकमकर यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा कशी असेल याबाबत अद्याप कुणालाही माहिती नाही.

  मांजरेकरांना हिट हवा
  अलीडकेच महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला फ्रेंडशिप अनलिमिटेड हा बनवलेला युथफूल मराठी चित्रपट दणकून आपटला होता. यात आकाश ठोसरने भूमिका केली होती. त्यानंतर ते “मांजा बोले’ या चॅट शोमध्ये व्यस्त होते. मात्र, त्यांचे काही चित्रपट फ्लॉप झाल्याने आता त्यांना “शिवाजी पार्क मुंबई २८’ या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145