Published On : Mon, Feb 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांत महायुती आघाडीवर; विजयाचे श्रेय मोदी–फडणवीसांच्या नेतृत्वाला – रवींद्र चव्हाण

Advertisement

मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत असून, बहुतेक ठिकाणी महायुतीने आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जात असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवल्या. या योजनांचा थेट फायदा सामान्य जनतेला झाला असून, त्याचा सकारात्मक परिणाम मतपेटीत दिसून आला आहे.

Gold Rate
Apr 24 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,51,900 /-
Gold 22 KT ₹ 1,41,300 /-
Silver/Kg ₹ 2,44,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सातत्याने विकासकामे सुरू असून, जनतेचा सरकारवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. “फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी महायुती म्हणून एकत्रितपणे काम केले. या एकजुटीचा फायदा निवडणुकीत झाला,” असे ते म्हणाले.

रवींद्र चव्हाण यांनी पुढे सांगितले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत महायुतीने आघाडी घेतली असून, १२ जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एकूणच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून महायुतीच्या धोरणांवर जनतेने विश्वास व्यक्त केला असून, आगामी काळातही विकासाचा वेग कायम राहील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement