Published On : Fri, Mar 13th, 2020

नागपुरात  महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप गुगल यांची आत्महत्या

नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप गूगल यांनी मालगाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केली.

ही घटना मुंबई आऊटरवर दुपारी १२.३० वाजता घडली. या आत्महत्येमागे नेमके कारण काय हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिस तपास सुरू आहे.

लवकरच सविस्तर वृत्त देत आहोत.