Published On : Thu, Dec 14th, 2017

विदर्भातील 36.31 लाख ग्राहकांना महावितरणची एसएमएस सेवा

Advertisement

Mahavitaran SMS Service
नागपूर: महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालायांतर्गत असलेल्या विदर्भातील तब्बल 36 लाख 31 हजार 296 ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद केली असून महावितरण कडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीज देयकाची रक्कम, किती युनिटचा वापर झाला, बील भरणा करण्याची मुदत, खंडित वीज पुरवठा, वीजपुरवठा स्थगिती सुचना यासंदर्भातील माहिती एसएमएस च्या माध्यमातून मिळत आहे.

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यात महावितरणचे तब्बल 47 लाख 83 हजार 894 वीज ग्राहक असून त्यात 39 लाख 42 हजार 485 ग्राहक हे घरगुती, वाणिज्यीक आणी औद्योगिक श्रेणीतील तर 8 लाख 41 हजार 409 ग्राहक हे कृषीपंप, सार्वजनिक पाणी पुरवठा, पथदिवे, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील आहेत त्यापैकी 36 लाख 31 हजार 296 वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद महावितरणकडे केली असून एकूण घरगुती, वाणिज्यीक आणि औद्योगिक ग्राहकांपैकी 86.8 टक्के म्हणजे तब्बल 34 लाख 20 हजार 115 ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंद करीत महावितरणच्या सेवेचा लाभ घेणे सुरू केले असून उर्वरीत ग्राहकांनीही त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद करावी यासाठी महावितरण प्रयत्नशिल आहे.

वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांक नोंदणीत नागपूर परिमंडलाने आघाडी घेतली आहे, यात नागपूर शहर मंडलातील 1 लाख 95 हजार 30 ग्राहकांनी, नागपूर ग्रामिण मंडलातील 3 लाख 69 हजार 596 तर वर्धा मंडलातील 3 लाख 2 हजार 826 ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे. अकोला परिमंडलांतर्गत असलेल्या अकोला मंडलातील 3 लाख 1 हजार 395 ग्राहकांनी, बुलढाणा मंडलातील 3 लाख 90 हजार 4 ग्राहकांनी तर वाशिम मंडलातील 1 लाख 51 हजार 333 ग्राहकांनी याचसोबत अमरावती परिमंडलांतर्गत असलेल्या अमरावती मंडलातील 4 लाख 61 हजार 403 ग्राहकांनी तर यवतमाळ मंडलातील 3 लाख 72 हजार 13 ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद करीत महावितरणच्या एसएमएसच्या माध्यमातील सर्व सेवा मोबाईलवर मिळविणे सुरु केले आहे. याचसोबत चंद्रपूर परिमंडलातील चंद्रपूर मंडलातील 3 लाख 52 हजार 261, गडचिरोली मंडलातील 2 लाख 47 हजार 305 ग्राहकांनी गोंदीया परिमंडलांतर्गत असलेल्या गोंदीया मंडलातील 2 लाख 32 हजार 457 तर भंडारा मंडलातील 2 लाख 55 हजार 673 ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे.

Gold Rate
Thursday 20 March 2025
Gold 24 KT 89,200 /-
Gold 22 KT 83,000 /-
Silver / Kg 100,700 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यास महावितरण कटिबद्ध असून एसएमएसद्वारे ग्राहकांना अनेक प्रकारची ग्राहकोपयोगी माहितीची सुविधा उपलब्ध करूंन देण्यात येत आहेत. ग्राहकांनी महावितरण कॉलसेंटरच्या टोल फ्री क्र. १८००२००३४३५/१८००२३३३४३५/१९१२० येथे तसेच महावितरणचे मोबाईल अ‍ॅप, वीज बिल भरणा केंद्र अथवा महावितरणचे संकेतस्थळं www.mahadiscom.in येथे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करीत महावितरणच्या या ग्राहकोभिमुख सेवांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement