Published On : Thu, Sep 28th, 2017

दीक्षाभूमीवर अखंडीत वीज पुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

नागपूर: धम्मचक्र दिनाच्या पार्शवभूमीवर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून दीक्षाभूमी परिसरात अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी महावितरणकडून विविध उपाय योजना केल्या आहेत. अशी माहिती मुख्य अभियंता श्री रफिक शेख यांनी दिली आहे.

महावितरणकडून मिळालेल्या माहिती नुसार ,दीक्षाभूमी आणि परिसरात अखण्डित वीज पुरवठा व्हावा यासाठी महावितरणकडून अभियंता आणि जनमित्रांची उद्या दिनाक २९ सप्टेंबर २०१७ पासून विविध ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय तातडीची गरज पडल्यास माता कचेरी परिसरात ६३० केव्हीए क्षमतेचा अतिरिक्त रोहित्र मोबाइल व्हॅनवर सज्ज ठेवला आहे. अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणकडून २२ अभियंता आणि ३८ जनमित्र , उपकेंद्र चालकांची नियुक्ती केली आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दीक्षा भूमी परिसरास लक्ष्मी वैभव येथील रोहित्र, काचीपुरा उपकेंद्र, माता कचेरी येथील रोहित्र येथून वीज पुरवठा केल्या जाणार आहे. दीक्षाभूमी येथील मुख्य स्तूपाला वसंत नगर येथील फिडर, ,छत्रपती नगर वाहिनीवरील एक्सप्रेस फिडर ,श्रद्धानंद पेठ फिडर वरून वीज पुरवठा होणार आहे. महावितरणच्या या उपकेंद्रांना महापारेषणच्या हिंगणा १ आणी २, बेसा , पार्डी येथील वीज उपकेंद्रावरुन वीज पुरवठा होणार आहे.

Advertisement
Advertisement