Published On : Mon, Sep 4th, 2017

महावितरण मोबाईल ॲपचे देशपातळीवर कौतूक

Advertisement

नागपूर: महावितरणने वीज ग्राहकांच्या सेवेसाठी तयार केलेल्या मोबाईल ॲपचे देशपातळिवर कौतूक होत असून इतर राज्यांनीही महावितरणचे अनुकरण करण्याच्या सुचना केंद्रीय ऊर्जामंत्री यांनी देशभरातील ऊर्जामंत्र्यांच्या बैठकीप्रसंगी केली असल्याची माहीती राज्याचे ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्कमंत्री मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

महावितरण मोबाईल अँप आणि ऑनलाइन वीज बिल भरणा या विषयांवरील पोस्टर्सचे विमोचन ऊर्जामंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विद्युत भवन नागपूर येथे नुकतेच करण्यात आले यावेळी ते बोलत होते. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार आणि त्यांच्या सहका-यांनी वीज ग्राहकांसाठी तयार केलेले हे मोबाईल ॲप अत्यंत कामाचे असून त्यासाठी ना. बावनकुळे यांनी महावितरणचे विशेष अभिनंदनही केले.

याप्रसंगी नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, आमदार विकास कुंभारे आणि डॉ मिलिंद माने, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफिक शेख, अधीक्षक अभियंता राकेश जनबंधू, सम्राट वाघमारे, मनिष वाठ, नारायण आमझरे व इतर मान्यवर उपस्थित होते.