स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट मुख्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात
अठराव्या शतकात धर्म व्यवस्थेसह मानसिक गुलामीला मुक्त करून सामाजिक व शैक्षणिक क्रांतीची ज्योत पेटविणारे थोर समाज सुधारक, असे प्रतिपादन स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्षा कुसुमताई तामगाडगे यांनी केले. महात्मा जोतिबा फुले यांच्या 195 वी जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट मुख्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी त्या बोलत होत्या.
ओमकार नगर येथील इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी परिसरातील मधुकरराव तामगाडगे प्रेरणा प्रबोधिनी वाचनालयात आयोजित कार्यक्रमात ट्रस्टचे सचिव निरगुसना ठमके, सल्लागार यशवंत बागडे, व्यवस्थापक अमोल कांबळे यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
पुढे बोलताना कुसुमताई तामगाडगे म्हणाल्या की, जाती-धर्मातील भेदाभेद नष्ट करून अठराव्या शतकात निर्भीडपणे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्यांनी केले. त्यावेळी बहुजन समाज दारिद्र आणि अज्ञानात खितपत पडलेला होता. शिक्षण मुठभर लोकांनाच घेण्याचा अधिकार होता. याशिवाय सावकारांच्या पाशात समाज त्रस्त होता. अशा कालखंडात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे बीज रोवून नवी क्रांती घडविली. त्यांनी बालविवाहावर निर्बंध घालून विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन देण्याचे काम केले. अश्या फुले दाम्पत्यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी भावनाही कुसुमताई तामगाडगे यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुनियोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर सरकाटे यांनी तर आभार प्रदर्शन स्लेशा वासनिक यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल गवई, प्रशांत सहारे, राजन शामकुळे, आकाश मानवटकर, सागर सरकाटे वैभव शंभरकर, प्राची भगत, प्रविण कापसे, संदीप बडोले, प्रज्ञा चहांदे, आशिष शेलारेसह मधुकरराव तामगाडगे प्रेरणा प्रबोधिनी वाचनालयातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.