नागपूर : सामाजिक क्रांतीचे अग्रदूत अस्पृश्य उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (११ एप्रिल) भारतीय जनपा पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. महात्मा फुले व्यापारी संकुल अर्थात कॉटन मार्केट येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला भाजपा प्रदेश सचिव व प्रवक्ता ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी ॲड. मेश्राम म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यतेने वखवखलेल्या देशात सामाजिक क्रांतीची ठिणगू पेटवली. अस्पृश्यांना जेव्हा पिण्याचे पाणीही मिळत नव्हते तेव्हा ज्योतिबांनी घरचा पाण्याचा हौद खुला केला. शिक्षणापासून वंचित ठेवले जात होत तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंनी शेण, माती, दगडाचा मारा सहन करून देशातील महिलांना, अस्पृश्यांना शिक्षणाची दारे खुली करून दिली.
म्हणूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरू मानायचे. बाबासाहेबांच्या गुरूस्थानी असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि विचार नेहमी प्रेरणादायी असल्याचेही ते म्हणाले.
सोबत फोटोःः महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करतांना ॲड धर्मपाल मेश्राम व इतर