Published On : Thu, Aug 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्र सरकारकडून वन्यजीव संवर्धनासाठी ३९.६९ कोटींचा निधी मंजूर

Advertisement

मुंबई : महाराष्ट्र सरकारने जखमी, अपंग आणि विशेष काळजीची गरज असलेल्या वन्यजीवांच्या उपचार व संवर्धनासाठी ३९.६९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महसूल आणि वन विभागाने याबाबत शासन आदेश जारी केला आहे.

या निधीतून राज्यातील विविध वनक्षेत्रांमध्ये वन्यजीवांच्या उपचार, देखभाल आणि संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. मंजूर निधीपैकी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला ३.५५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.याशिवाय पेंच वनक्षेत्रासाठी २ कोटी, पुणे वन विभागासाठी २.१५ कोटी आणि डहाणू क्षेत्रासाठी २.९९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

Gold Rate
Sept 28,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 49,200 /-
Gold 22 KT ₹ 1,38,500 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी निधीचा वापर शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. तसेच वन्यजीव संरक्षणाशी संबंधित कायदे आणि नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

जखमी किंवा उपचाराची गरज असलेल्या वन्यजीवांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबवता याव्यात, यासाठी हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.