Published On : Tue, Aug 1st, 2017

ऑगस्ट महिना घेऊन आलाय सुट्ट्यांचा सुकाळ

Two beach chairs on the tropical sand beach

वीकेण्डचा आनंद लुटू पाहणाऱ्यांना ऑगस्ट महिना सुट्ट्यांचा सुकाळ घेऊन आलेला आहे. सलग लागोपाठ सार्वजनिक सु्ट्ट्या आल्याने अनेकांनी सुट्ट्यांचे नियोजन केलेही आहे.

सलग तीन आठवडे वीकेण्डला धरून सार्वजनिक सुट्ट्या आल्या आहेत. मधले एक वा दोन दिवस रजा घेऊन सलग ५ ते ६ दिवसांचे सुट्ट्यांचे नियोजन करता येणार आहे.

४ ऑगस्टला सुट्टी घेतली तर पुढचे ५ ते ७ ऑगस्टपर्यंतचे सलग तीन दिवस सुट्टीचे मिळून ४ दिवसांचा प्लान करता येणार आहे. त्यापुढील सलग आठवड्यात १२ आणि १३ ऑगस्ट रोजी शनिवार-रविवार, १४ ऑगस्टला जन्माष्टमीला सुटी घेतल्यास १५ ऑगस्टला पुन्हा स्वातंत्र्यदिनाची सुट्टी, त्यानंतर १६ ऑगस्टला सुट्टी घेतल्यास १७ ला पतेतीची सुट्टी अशा सलग ६ दिवसा सुट्ट्या मिळणार आहेत.

त्यापुढील आठवड्यात पुन्हा २५ ऑगस्टला शुक्रवारी गणेशोत्सव आणि त्यापुढे शुक्रवार, शनिवार अशी लागून सुट्टी घेता येऊ शकेल