Published On : Fri, Jun 8th, 2018

राज्यात दहावीचा निकाल ८९.४१ टक्के ; मुलींचीच बाजी

Maharashtra State and Higher Secondary Education Board

मुंबई: राज्यातील दहावीचा निकाल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केला. राज्यात दहावीचा निकाल ८९.४१ टक्के इतका लागला असून ८७.२७ टक्के विद्यार्थी तर ९१.९७ विद्यार्थिनी उत्तिर्ण झाल्या आहेत. त्यामुळे यंदाही मुलीच मुलांपेक्षा सरस ठरल्या आहेत. तसेच विभागनिहाय विचार करता कोकण विभागाच सर्वोत्तम ठरला असून येथील ९६ टक्के परीक्षार्थी उत्तिर्ण झाले आहेत.

निकालाची विभागीय टक्केवारी
१) कोकण : ९६.०० टक्के
२) कोल्हापूर : ९३.८८ टक्के
३) पुणे : ९२.०८ टक्के
४) मुंबई : ९०.४१ टक्के
५) औरंगाबाद : ८८.८१ टक्के
६) नाशिक : ८७.४२ टक्के
७) अमरावती : ८६.४९ टक्के
८) लातूर : ८६.३० टक्के
९) नागपूर : ८५.९७ टक्के

हावीचा ऑनलाइन निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना वेबसाइटवर सर्व विषयांचे गुण उपलब्ध होतील.

तसेच सदर माहितीची प्रिंटआऊटही घेता येईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.