मुंबई: अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी नुकतेच राष्ट्रीय काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाच्या अध्यक्ष पदी डॉ. नितीन राऊत यांची नियुक्ती केली आहे. नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथमच महाराष्ट्रात आले असता सर्वप्रथम त्यांनी चैत्यभूमी दादर येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना अभिवादन केले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी डॉ. नितीन राऊत यांचे स्वागत केले. यावेळी मुंबई काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू यादव व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे पदाधिकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advertisement

Advertisement
Advertisement