मुंबई : देशात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो.यापार्श्वभूमीवर दिल्लीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.यादरम्यान राष्ट्रपतींच्या हस्ते
सन्मानार्थीना पुरस्कार दिला जातो.
यामध्ये शाळकरी मुलं, तरुण आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. यावर्षीदेखील राज्यातील 3 वरिष्ठ पोलीस अधिकारी, अग्निशमन दलातील एक अधिकारी, कारावास सेवेतील एक हवालदार यांना पोलीस सेवेतील अतुलनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. तर 17 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी पोलीस सेवेतील अतुलनीय शौर्यतेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील अतुलनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक-
चिरंजीव रामचबिला प्रसाद, अतिरिक्त पोलिस महासंचालक
राजेंद्र बालाजीराव दहाळे, संचालक
सतीश रघुवीर गोवेकर, सहायक आयुक्त
अग्निशमन दल-
संतोष वारीक, मुख्य अग्निशमन अधिकारी, महाराष्ट
कारावास सेवा-
अशोक ओलंबा, हवालदार
महाराष्ट्र पोलीस सेवेतील शौर्यतेसाठी राष्ट्रपती पदक-
कुणाल शंकर सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी
दीपक आवटे, पोलीस उपनिरीक्षक
कै. धनाजी होनमाने, पोलीस उपनिरीक्षक (मरणोपरांत)
नागेश कुमार एम. (नायक पोलीस शिपाई)
शकील युसूफ शेख ( पोलीस शिपाई)
विश्वनाथ पेंदाम ( पोलीस शिफाई)
विवेक नारोटे ( पोलीस शिपाई)
मोरेश्वर पोटवी ( पोलीस शिपाई)
कैलास कुलमथे (पोलीस शिपाई)
कोठला कोर्मी ( पोलीस शिपाई)
कोर्के वेलडी ( पोलीस शिपाई)
महादेव वानखडे ( पोलीस शिपाई)
आयपीएस अनुज तारे (अतिरिक्त पोलिस अधिक्षक)
राहुल देव्हडे (पोलीस उपनिरीक्षक)
विजय सकपाळ ( पोलीस उपनिरीक्षक)
महेश मिच्छा ( हेड कॉन्स्टेबल)
समया असम ( नायक पोलीस शिपाई)