Published On : Mon, Sep 7th, 2020

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेने च्यावतीने नारे निदर्शने व आंदोलन संपन्न

Advertisement

नागपुर – कोरोना च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेने तर्फे असंघटित क्षेत्रातील मजूर कामगार इत्यादींच्या जीवितांचे रक्षण व जनजीवन सुरळीत करण्या संदर्भात, तसेच संपूर्ण भारत देशात मार्च २०२० पासून कोरोना महामारी रोगाच्या पार्श्वभूमीवर कायदा व आपत्ती निवारण व्यवस्थापन कायद्याअंतर्गत विविध निर्बंध लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून देशाची अर्थव्यवस्था हालावली म्हणून आज सोमवारी ७ सप्टेंबरला संविधान चौकात, जिल्हाध्यक्ष सचिन धोटे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. तसेच विभागीय आयुक्त यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

या आंदोलना प्रसंगी प्रमुख राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या अध्यक्षतेत पार पडले. आणि प्रमुख उपस्थितीत मान्यवर प्रवीण बरडे वरिष्ठ पदाधिकारी,अजय ढोके शहर अध्यक्ष, मंगेश शिंदे शहर संघटक, सुरेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष, गजानन टिपले जिल्हा उपाध्यक्ष, किशोर सरायकर जिल्हा अध्यक्ष व अचला मेसन ज्येष्ठ महिला पदाधिकारी आणि मनसेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी प्रमुख उपस्थितीत या आंदोलनात सहभागी होते. पूर्वी काही महिने लॉकडाऊन व आता अनलॉकची प्रक्रिया यामध्ये फरक दिसून येत नाही. याचा परिणाम म्हणून संपूर्ण देशात करोडो लोक बेरोजगार झालेत तर कित्येक लोक भूकमारीच्या अवस्थेत खितपत पडून आहेत. रोगापेक्षा इलाज भयानक असल्याची वर्तमान स्थितीवरून निष्पन्न होत आहे. सध्या मरण्याच्या भयापेक्षा जगणे कठीण झाले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती काय आहे ? हे तर माहीत नाही परंतु असंघटित क्षेत्रातील मजूर व कामगारांची अवस्था खूप भयावह आहे.

जीवन जगण्याला काही अर्थ नसल्याची भावना सर्व निर्माण होत आहे व यामधून मानसिक संतुलन ठेवणे कठीण झाले आहे. आपत्ती निवारण कायद्याच्या अंमलबजावणी मुळे साथ रोगांचे संक्रमण किती थांबवले ? हे सांगता येणार नाही, परंतु कायदा व नियमांचा बडगा दाखवून कायमस्वरूपी आपत्ती ची अवस्था निर्माण झाली आहे. हे मात्र स्पष्ट होते. सर्वत्र नैराश्य व कमालीची उदासीनता पसरली आहे. आज संपूर्ण देश आजारी पडला की काय ? असे चित्र निर्माण करण्यात येत असून येथे सर्व नागरिक रोगी आहेत. अशीच भावना सार्वत्रिक दाखवल्या जात आहे. अस्पृश्यता काय असते ? हे या महामारी तथा मारामारीचे रूपाने दिसून येते. गेल्या मार्च महिन्यापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत केंद्र व राज्य सरकार यांच्या धोरणास अनुसरून स्थानिक प्रशासनाने घेतलेले निर्णय, जगण्याचा हक्क हिरावून घेतल्यासारखे वाटते. कुठे लॉकडाऊन तर कुठे अनलॉक, सर्व गोंधळ व संभ्रमात भर पाडणारी अवस्था निदर्शनास येते.


यात आपत्ती काय ? व निवारण कशाचे ? याचे भान कुणालाही दिसून येत नाही. या सर्व परिस्थितीचा परिणाम समाजातील वेगवेगळ्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार व मजूर वर्गावर झाला आहे. त्यास वाचा फोडणारा कुणी समोर आला नाही किंवा हा विषय संवेदनशील मनाने समजून घेण्यासाठी कोणतेच व्यासपीठ उपलब्ध नाही. म्हणून समाजातील या दुर्लक्षित, नेतृत्वहीन, उपेक्षित व असंघटित क्षेत्रातील कामगार, मजुरांची होत असलेली उपासमार, हाल-अपेष्टा व त्यामधून भविष्यात निर्माण होणारी भीषणता शासन दरबारी प्राधान्याने समजून घ्यावी. म्हणून या आंदोलना द्वारे प्रकाश टाकला व वास्तवदर्शी प्रयत्न गेल्या ६ महिन्यापासून लोकांचे होत असलेले दमन हे निश्चितच लोकांचे आरोग्य दुरुस्त ठेवण्यास सहाय्यभूत ठरणारे नाही. लोकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील. आधीच भयग्रस्त असलेला समाज रोगाला सहज शरण जाईल व गूढ मृत्यूच्या गर्तेत ओढला जाईल. म्हणून लोकांचे जगणे व त्यास असणारा अर्थ समजून घेतला तरी आपत्ती निवारण्यापेक्षा अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी ची उपक्रम प्राधान्याने राबविण्याचा विचार करण्यात यावा.

आणि त्यामधून असंघटित क्षेत्राला स्थैर्य व बळकटी देण्याचे प्रमाणिक प्रयत्न व्हावे तसेच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी लावली जाणारी निर्बंध किमान तर्कबुद्धीच्या क्षमतेवर व शास्त्रीय कारणमिंमासेवर तपासले जावेत. खरच आमच्या जीवाची एवढी काळजी सरकारला आहे काय ? काळजी असेल तर आमच्या जगण्याला व जीवन चरितार्थाला संरक्षण देऊन, जीवन जगण्याचा आमचा अधिकार मान्य करावा. मूलभूत हक्क संरक्षण द्यावे. आम्ही देशाचे नागरिक आहोत. गुलाम नाही! आत्मनिर्भर तेचे स्वप्न म्हणजे रोजगार, स्वयंरोजगार की बेरोजगार ? हे कळू द्या! आमचे दोन हात देशहित कार्यास लावू द्या! ज्या कामगार व मजुरांच्या बळावर नवनिर्मितीचे स्वप्न दाखवली जातात, किंवा या मजुरांच्या श्रमावर आज पर्यंत नवनिर्माण केल्या गेले, त्यांचे हात बेरोजगारीच्या कुर्‍हाडीने कापू नका ? हात म्हणजेच कर व कर म्हणजेच महसूल एवढे लक्षात असू द्या. यावरच जीवन म्हणजे अर्थव्यवस्था अवलंबून आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे संघटक व जिल्हा अध्यक्ष सचिन धोटे यांनी असंघटीत क्षेत्रातील कामगार व मजूर इत्यादींच्या जीविताचे रक्षण करून जनजीवन सुरळीत करण्यासाठी आज हे आंदोलन करीत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे तसेच नागपूर जिल्ह्याचे संघटक सचिन धोटेंनी यावेळी म्हटले आहे.