Published On : Mon, Jun 12th, 2023
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्र MHT-CET चा निकाल जाहीर ; ‘या’ वेबसाईटवर पाहा निकाल

Advertisement

नागपूर :महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलकडून एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यंदा एमएचटी-सीईटीच्या परीक्षेसाठी एकूण ६,३६,०८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) ग्रुप्ससाठी महाराष्ट्र कॉमन एंट्रेन्स टेस्ट २०२३ चा निकाल घोषित करण्यात आला असून परीक्षार्थी हा निकाल अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org, mahacet.in आणि mahacet.org वर तपासू शकता. उमेदवार त्यांच्या परीक्षेचा रोलनंबरच्या मदतीने निकाल तपासू शकता.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

परीक्षेसाठी नोंदणी केल्या गेलेल्या एकूण ६,३६,०८९ विद्यार्थ्यांपैकी ३,०३,०४८ विद्यार्थ्यांनी पीसीएम (PCM) विभागासाठी तर २,७७,४०३ विद्यार्थ्यांनी ९ ते १३ मे दरम्यान ही परीक्षा दिली. १५ मे ते २० मे पर्यंत पीसीबी ग्रुपच्या सीईटीसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी ३,३३,०४१ विद्यार्थ्यांनी नोंदकी केली होती. परंतु, यापैकी ३,१३,७३२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

Advertisement
Advertisement