Published On : Sat, Mar 18th, 2017

यंदा आंब्याच्या उत्पादनात होणार घट

Mangoes

मुंबई: तापमानात अचानक झालेली वाढ आणि वारंवार पडणार धुके यामुळे हापूसचा मोहोर करपून गेला आहे. याचा परीणाम हापूस निर्यातीवर मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे यंदा आंब्याच्या उत्पादनात घट होणार आहे.

यावेळी २५ टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न सिंधुदुर्गातल्या हापूसच आल्याचे चित्र आहे. पर्यायाने या सर्वाचा फायदा कर्नाटकच्या हापूसला मिळू लागला आहे. बॅक्टेरियल कंकर नावाचा रोग यंदा हापूस आंब्यावर पडला आहे. या रोगातून आंबा कसा वाचवायचा याची माहितीच कृषी विभागाला नसल्याचे खुद्द शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा जेमतेम २० ते २५ टक्केच पीक हाती येणार असल्यामुळे शेतकऱ्यांची पूर्ण मेहनत मातीमोल झाली आहे.

जिकडे पहावा तिकडे काळा करपलेला मोहोर आणि गळून पडलेली छोटी छोटी आंब्याची फळं दिसून येत आहेत. सध्या सिंधुदुर्गातल्या बहुतेक आंबा बागायतींमध्ये सध्या हे असच दृष्य पाहायला मिळतंय. तापमानात झालेली प्रचंड वाढ आणि अचानक पडणारी थंडी यामुळे हापूसची मोठ्या प्रमाणावर घळ झाला आहे.


काय आहेत शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी ??

१)पीक विमा योजनेच्या सरकारी निकषांमध्ये कोकणात गारपीट होत नसतानाही गारपिटीचा निकष लावलाय. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना विमा योजनेचाही काही फायदा नाहीय.
२)आंब्याच्या नुकसानासाठी शासकीय मदत मिळवायची तरी कशी या विवंचनेत इथला शेतकरी अडकलाय.