Published On : Sat, Mar 18th, 2017

राज्य अर्थसंकल्प 2017: अखेर कर्जमाफी नाहीच; विरोधकांच्या अभूतपूर्व गदारोळात राज्य सरकारने अर्थसंकल्प रेटला

मुंबई: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असताना, विरोधकांनी सुरु केलेला गदारोळ, शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिला. त्यामुळे या गदारोळातच मुनगंटीवारांनी अर्थसंकल्प सादर केला.

मुनगंटीवार यांनी विरोधकांचे चिमटे काढत, कधी कविता, कधी शेरो-शायरी सादर करत बजेट मांडलं.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार लाईव्ह –

काय महाग, काय स्वस्त

देशी विदेशी दारु महागली, कर वाढलेस्वाईप मशीनवरील कर काढल्याने, मशीन्स स्वस्तऑनलाईन, पेपर लॉटरी महागली, कर वाढवलामिल्क टेस्टींग किटवरचा कर काढलाछोट्या शहरातील विमानतळांवरचे कर कमी केलेऊस खरेदी कर माफ केला जाणारशेततळ्यांकरता जिओमेंब्रेनवरील करमाफीसॉईल टेस्टींग किटवरील करमाफीविद्युतदाहिनी व गॅसदाहिनीवरचा करही शून्य
जीएसटी येईपर्यंत काही स्वस्त
जीवनावश्यक वस्तू – तांदूळ, गहू, डाळी, हळद मिर्ची, चिंच गूळ, नारळ, धणे, मेथी, पापड, ओला खजूर सोलापूरी चादर, आमसूल, बेदाणे, मनुका यावरील मुल्यवर्धित कर जीएसटीपर्यंत माफ

कर
कुठलीही करवाढ प्रस्तावित नाहीGST कर 0,12,18
4511 कोटी महसूल तूट येत आहे


कामगार

राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित श्रेणी देता यावी यासाठी अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापनाकेंद्राच्या धर्तीवर राज्य शासन आता भांडवली खर्चावर लक्ष केंद्रीत करणार, त्यामुळे प्रत्येक विभाग त्यांची तरतूद स्वतंत्रपणे वापरु शकेल.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा मानस

सुरक्षा

पोलिस, अॅम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडसाठी एकच नंबर – ‘डायल 112’पोलीस गृहनिर्माणासाठी 325 कोटींचा निधीरस्ते अपघात रोखण्यासाठी ३४ कोटी ८६ लाख निधीनवी मुंबई, मिरा-भाईंदर, अमरावती, चंद्रपूरमध्ये सीसीटीव्ही बसवणार

डिजिटल महाराष्ट्र

प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी, ई तंत्रज्ञानाच्या वापरासा माहिती तंत्रज्ञानाला 200 कोटींचा निधीसार्वजनिक वितरण व्यवस्था कॅशलेस केली जाणार2018 पर्यंत 28 हजार ग्राम पंचायती डिजिटल करणार

स्मारकं

शिवाजी महाराज स्मारक- अरबी समुद्रशाहू महाराज – कोल्हापूरडॉ. बाबासाहेब आंबेडकर – इंदू मिल, दादरबाळासाहेब ठाकरे – मुंबई
सर्व स्मारकांसाठी २०० कोटी

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं अहमदनगरमधील जामखेडमध्ये स्मारक बांधणार

पर्यटन

सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या रौप्यमहोत्सवानिमित्त २५ कोटीतसंच पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध सुविधांसाठी १०० कोटीपर्यटन स्थानच्या विकासासाठी 174 कोटीआषाढी एकादशी पंढरपूरवारी या अर्थसंकल्पसून 3 कोटी निधी निर्मल वारीसाठी

मानव विकास निर्देशांक कमी असलेल्या तालुक्यांसाठी 100 कोटींची विशेष तरतूदसार्वजनिक वितरण व्यवस्था कॅशलेस केली जाणारगांधींजी – सेवाग्रामच्या वास्तव्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत – सेवाग्राम विकासाठी २६६. ५३ लाख रुपयाचा सेवाग्राम आराखडा होता त्यासाठी ९३.८० लाखची तरतूद

महिला

महिला आयोगाला 7 कोटी 94 लाखअंगणवाडी बालकांना जेवणासाठी 310 कोटी,महिला सक्षमीकरणासाठी 7 कोटी 94 लाख रुपयेशालेय विद्यार्थिंनींना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यासाठी योजनाकुपोषणासंदर्भातील भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची व्याप्ती वाढवत गरोदर व स्तनदा माता तसेच बालके यांच्या पोषण आहारात वाढ

धान खरेदी/ गोदामे

आदिवासी विकास महामंडळामार्फत गडचिरोली, गोंदिया, नागपूर, पालघर व ठाणे या पाच जिल्हयांमध्ये धानखरेदी व साठवणूकीसाठी 49 गोदामे भाडेतत्वावर उपलब्ध करणारशासकीय गोदामांची संख्या वाढवणार – त्यासाठी ८० कोटींची तरतूद

अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय

स्वतंत्र ओबीसी महामंडळासाठी 2 हजार 384 कोटींची तरतूदअनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 7 हजार 231 कोटी रु. निधीची तरतूद.चंद्रपूर येथील दिक्षा भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करणारअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ 200 कोटीशामराव पेजे कुणबी विकास 200 कोटीअल्पसंख्यांक 332 कोटी
राज्यातील अल्पसंख्याकबहुल क्षेत्रात नागरी सुविधांसाठी – १२५ कोटी विशेष बाबअल्पसंख्याक उमेदावारांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी ८ कोटीसंजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेसाठी 1 हजार 884 कोटी 99 लक्ष रु. निधीची तरतूदआदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी उपयोजना कार्यक्रमासाठी 6 हजार 754 कोटी रु. एवढा नियतव्यय प्रस्तावितअनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांमध्ये उद्योजगता निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाने घोषित केलेल्या स्टॅण्डप इंडिया योजनेतंर्गत मार्जिन मनी देण्यासाठी 25 कोटी रु. निधीची तरतूद

विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गासाठी स्थापित विभागांतर्गत विविध कल्याणकारी योजनांसाठी 2 हजार 384 कोटी रु. निधीची तरतूदविमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी व त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) स्थापन करणार

पर्यावरण

पेंच, नागझिरा, नवेगाव अशा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी 80 कोटी तरतूदवन्य प्राण्यांचा पिकांना होणारा त्रास रोखण्यासाठी योजना, 25 कोटींची तरतूदगावागावातील पर्यावरण विषयक योजनांसाठी- २० कोटीवन वणवे – चंद्रपूरात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण – ५ कोटी
मानव वन्य जीव संघर्ष कमी करण्यासाठी अभयारण्यातून स्वखुशीने स्थलांतरीत होणा-या लोकांसाठी जमीन मोबदला बाजारभावाच्या 4 पट देण्याचा निर्णय, त्यासाठी 45 कोटी रु. निधीची तरतूदगेल्यावर्षीच्या विक्रमी वृक्ष लागवडीच्या प्रक्रियेत सातत्य ठेवण्याचा निर्धार, पुढील 3 वर्षामध्ये 50 कोटी वृक्षारोपण करण्याचे नियोजन, सन 2017 मध्ये 4 कोटी, सन 2018 मध्ये 13 कोटी व सन 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवड करणार

नदी विकास

नद्यांच्या शुद्धीकरणाचं काम प्राधान्याने हाती घेणारमुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी 990 कोटी 26 लाखांची तरतूद – अर्थमंत्री, केंद्राकडून 100 कोटी अर्थसहाय्य अपेक्षित आहे

आरोग्य

मेडिकल कॉलेज इमारत बांधणीसाठी 559 कोटींची तरतूदऔरंगाबाद येथील कर्करोग रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणार – १२६ कोटीकर्करोग – तीन प्रकारच्या कर्करोगांचे निदान व्हावे यासाठी – अद्ययावत यंत्रणा स्थापन होईल – ४३ कोटीसिटी स्कॅन मशीन ३१ रुग्णालयात मिळणार – त्यासाठी ७७ कोटी ५० लाख१३१६ कोटी – महात्मा फुले जीवनदायी योजनाराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान – २११ कोटीसाथरोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार

केंद्र शासनाच्या अटल मिशन फॉर रिज्यूवेशन व अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) योजनेसाठी 1 हजार 870 कोटी रु. निधीची तरतूदस्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि मुखकर्करोगांच्या ‍निदानासाठी 253 शासकीय आरोग्य संस्थामध्ये मॅमोग्राफी मशीन, कोल्पोस्कोप व व्हेलस्कोप मशीन उपलब्ध करणार, यासाठी 43 कोटी रु. निधीची तरतूदसर्वसामान्य रुग्णांना अचूक रोगनिदानासाठी 31 रुग्णांलयांमध्ये सिटीस्कॅन मशीन उपलब्ध करण्याचा निर्णय, यासाठी 77 कोटी 50 लक्ष रु. निधीची तरतूदराजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवत महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना राबविण्याचे प्रस्तावित, यासाठी 1 हजार 316 कोटी रु. निधीची तरतूद
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत राज्यातील ग्रामीण जनता, महिला व बालके यांना गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी 1 हजार 549 कोटी रु. निधीची तरतूदराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातंर्गत 50 हजार पर्यत लोकासंख्या असलेल्या शहरांमध्ये उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 211 कोटी रु. निधीची तरतूदशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णांलयांचे बांधकाम तसेच बळकटीकरणासाठी 559 कोटी 30 लक्ष रु. निधीची तरतूदमहाराष्ट्र, कर्नाटक व गोवा सीमाभागात आढळून येत असलेल्या माकडताप या रोगासाठी निदान उपचार, प्रशिक्षण व संशोधन यासाठी साथरोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्ग जिल्हयात उभारण्याचा निर्णय

मेट्रो प्रकल्प

मेट्रो प्रकल्पासाठी 700 कोटी⁠⁠⁠⁠,मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी 700 कोटींची तरतूदमुंबई, पुणे व नागपूर येथील मेट्रो प्रकल्पांसाठी एकत्रित 710 कोटी रु. निधीची तरतूद
मुंबई महानगर क्षेत्रात हाती घेण्यात आलेल्या शिवडी न्हवाशिवा, नवी मुंबई विमानतळ, नवी मुंबई मेंट्रो हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील

उद्योग

औद्योगिकदृष्टया मागासलेल्या भागास नवीन उद्योगांच्या निर्मितीसाठी पॅकेज स्कीम ऑफ इंन्सेटिव्हज् ही योजना राबविणार, यासाठी 2 हजार 650 कोटी रु. निधीची तरतूदसुक्ष्म, लघू व मध्यम औद्योगिक उपक्रमांची उत्पादकता उंचावण्यासाठी 60 कोटी रु. निधीची तरतूद
औद्योगिक समुह विकास योजनेतंर्गत गुंतवणूकदारांसाठी औरंगाबाद येथे जागा उपलब्ध, या योजनेसाठी राज्यशासनाचा सहभाग म्हणून 570 कोटी रु. निधीची तरतूद

सर्वांसाठी घर

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 2 लाख 50 हजार घरं शहरी भागात बांधणार
स्मार्ट सिटी योजना

स्मार्ट सिटी योजनेसाठी 1600 कोटी, सात शहरांचा समावेस

पाणी

ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यासाठी 300 कोटींची तरतूदमराठवाड्याला पाणी पुरवठ्यासाठी 15 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद१६०५ कोटी स्वच्छ महाराष्ट्र अभियानग्रामीण भागातील स्वच्छ भारत मिशन योजनेतंर्गत मार्च 2018 पर्यत संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार, यासाठी 545 को7टी 66 लक्ष रु. निधीची तरतूद

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातंर्गत 500 नवीन पाणीपुरवठा योजनांना मान्यता देण्याचे नियोजन, यासाठी 300 कोटी रु. निधीची तरतूदशाश्वत व गुणवत्तापुर्ण पाणीपुरवठयासाठी जलस्वराज्य 2 या कार्यक्रमातंर्गत 39 निमशहरी गावांना वाढीव पाणीपूरवठा योजनांसाठी 200 कोटी रु. निधीची तरतूदमराठवाडयातील दुष्काळावर कायस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी एकात्मिक ग्रीड पध्दत वापरणार, त्यासाठी पुर्वव्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी 15 कोटी रु. निधीची अतिरीक्त तरतूदनगर परिषदा, नगर पंचायती व ड वर्ग महानगरपालिकात सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबविण्यासाठी 1100 कोटी रु. निधीची तरतूद

विमानतळ

शिर्डी विमानतळाचा विकास लवकरात लवकर करण्याचा मानसशिर्डी साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत.. शिर्डी विमानतळ लवकरच करणार.. अमरावती, शिर्डी अशा विमानतळासाठी 50 कोटीबंदर क्षेत्राच्या विकासासाठी 70 कोटींची तरतूदनागपूर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करणारनवी मुंबई विमानतळ लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील : अर्थमंत्री

ऊर्जा

नागपूरच्या मिहान प्रकल्पासाठी 17-18 या वर्षी 100 कोटींची तरतूदविदर्भ, मराठवाड्यात उद्योग येण्यासाठी वीज दरात सवलत, एक हजार कोटींची तरतूदराज्यात वीज-पाणी वाचवण्यासाठी ग्रीन इमारती बांधण्यावर भरपायाभूत सुविधांच्या विकासासाठी #महाइन्फ्रा ही संस्था स्थापन केली जाणारकेंद्र शासनाकडून अपांरपारिक उर्जेकरीता प्राप्त झालेल्या प्रोत्साहनात्मक अनुदानाच्या रकमेपोटी 361 कोटी रु. निधीची तरतूदमहानिर्मिती कंपनीकडून राज्यात पहिल्या टप्प्यामध्ये 750 मेगावॅटचा सौर उर्जा प्रकल्पाची निर्मिती करणार, त्याकरीता 525 कोटी रु. निधीची तरतूदविदर्भ मराठवाडा विभागात औद्योगिक घटकांना प्रोत्साहनासाठी वीज दरात सवलतीसाठी 1000 कोटी रु. निधीची तरतूद

पायाभूत सुविधा – रस्ते

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 1630 कोटी, तर 50 कोटी प्रलंबित रेल्वे मार्गांसाठीरस्ते सुधारण्यासाठी सात हजार कोटींची तरतूददहा हजार किलोमीटरचे रस्ते येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचं लक्ष्य : अर्थमंत्रीराज्याची प्रगती अशीच कायम राहिली तर विरोधक एक-दोन मतदारसंघात निवडून येतीलहायब्रीड ॲन्युईटी मध्ये अर्थसंकल्पित 195 कामांसाठी 3 हजार 500 कोटी रु. निधीची तरतूदकेंद्रीय मार्ग निधी योजनेतंर्गत 2 हजार 211 कि.मी. रस्त्यांची लांबी सुधारण्यात येत असून 252 मोठया पुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात येणारगेल्या 54 वर्षाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गांची लांबी 4 हजार 571 कि.मी. होती ती गेल्या दोन वर्षात 10 हजार 833 कि.मी. वाढल्याचा गौरवपूर्ण उल्लेखमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 1 हजार 630 कोटी रु. निधीची तरतूद, 4 हजार 700 कि.मी. लांबीचे रस्त्यांची कामे प्रगतीपथावरप्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत सुविधा विकास कंपनी स्थापन करण्यासाठी 50 कोटी रु. निधी उपलब्ध करणाररेल्वे मंत्रालय व राज्य शासन यांच्या संयुक्त भागीदारीतून अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-यवतमाळ-नांदेड, वडसा देसाईगंज –गडचिरोली या रेल्वे प्रकल्पांसाठी 150 कोटी रु. निधीची तरतूद

शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या शतकपूर्तीनिमित्त मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था असे नामकरण करून विभागाची पुनर्रचना करणार, यासाठी पुढील 5 वर्षात 25 कोटी रु. निधी उपलब्ध करणारराष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान रुसा या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 40 कोटी रु. निधीची तरतूदऔरंगाबाद येथे स्थापन होणा-या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी 39 कोटी 28 लक्ष रु. निधीची तरतूदचंद्रपूर येथे सैनिकी शाळा सुरु करण्यासाठी 200 कोटी रु. निधीची तरतूदनॅशनल स्कूल ऑफ़ ड्रामाच्या धर्तीवर मुंबईच्या गोरेगावमध्ये महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा उभारणारमराठी भाषा संवर्धनासाठी १७ कोटींची तरतूद
तरुणांसाठी

1 लाख 22 हजार युवकांना रोजगार प्रशिक्षण देण्याची योजनाअसंघटीत कामगारांसाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करणारशिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी
सातारा सैनिक शाळेच्या धर्तीवर चंद्रपुरात सैनिक शाळा सुरु करणारप्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता विकास योजना सुरु करणारसिंधुदुर्ग जिल्ह्यात खेकडा उपज केंद्र उभारणारम. गांधी राष्‍ट्रीय रोजगार हमी योजनेसाठी मजूरीचा दर 192 रु. वरुन 201 रु. इतका करणारतरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास उद्योजकता योजनागवंडी कामगारांना प्रशिक्षित करणार, 10 हजार गवंडी कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणार
35 उद्योग समूहांबरोबर सामंजस्य करार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करणार – अर्थमंत्रीकेंद्र पुरस्कृत ग्रामीण कौशल्य योजनेसाठी 59 कोटी 66 लक्ष रु. निधीची तरतूद, 21 हजार 597 लाभार्थ्याना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजनपरसातील कुक्कुटपालनास प्रोत्साहन देण्यासाठी 302 तालुक्यांमध्ये खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणारदुर्गम भागातील पशू आरोग्य सेवेसाठी 349 फिरते पशूवैद्यकीय चिकित्सालय स्थापन करणारमेंढीपालनास प्रोत्साहन देण्यासाठी 75 टक्के अनुदानावर मेंढीगटाचे वाटप करण्याचा निर्णयकांदळवन सहव्यवस्थापन समितीद्वारा रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय, यासाठी 15 कोटी रु. निधीची तरतूदतामिळनाडूच्या धर्तीवर सिंधुदूर्ग जिल्हयात खेकडा उपज केंद्र सुरु करणार, यासाठी 9 कोटी 31 लक्ष रु. निधीची तरतूदबांबू क्षेत्राच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य बांबू प्रवर्तन यंत्रणा स्थापित करण्याचा निर्णय, यासाठी 15 कोटी रु. निधीची तरतूदअसंघटीत कामगारांसाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करणाररोजगार निर्मिती व कौशल्य विकासाच्या योजनांच्या देखरेख व नियंत्रणासाठी नियोजन विभागामार्फत नियंत्रक कक्ष स्थापन करणार
शेतीसाठी

कृषी शिक्षणाला चालना देण्यासाठी यवतमाळ, नाशिक, पेठ (सांगली) येथे कृषी महाविद्यालये सुरु करणारमराठवाड्यातील 4000 गावात, विदर्भातील 100 गावात शेतीला संरक्षण देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पनियमित कर्ज भरत आहेत, त्या शेतकऱ्यांना नम्र विनंती, कर्ज थकवू नका : अर्थमंत्रीशेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी सरकार कटिबद्धनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ होईल अशी योजना आणणारथकीत कर्ज संपवावे लागेल, सातबारा कोरा करावा ही आमची भूमिकाकृषी क्षेत्रातील उत्पन्न 2021 पर्यंत दुप्पट करणारभाजीपाल्याला कोल्ड व्हॅन देण्यासाठी विशेष योजना
शेतकऱ्यांना तातडीने कर्ज मिळावं, यासाठी तरतूदवीज जोडणीसाठी 981 कोटी रुपयांची तरतूद – अर्थमंत्रीमागेल त्याला शेततळं योजनेसाठी निधी कमी पडू देणार नाहीमराठवाड्यातील कृष्णा खोरे पाणी प्रकल्प येत्या 4 वर्षात पूर्ण करणारजलयुक्त शिवारच्या माध्यमातून दरवर्षी 5 हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचं ध्येयजलयुक्त शिवारासाठी आतापर्यंत 1600 कोटी दिले, पुढील वर्षासाठी 1200 कोटींची तरतूदअवर्षणग्रस्त भागासाठी पाणी पुरवठा प्रकल्प चार वर्षात पूर्ण करणारजलसंपदा विभागात 8 हजार 233 कोटींची तरतूदकोकणात काजू लागवड आणि त्यावर प्रक्रियेचा कार्यक्रमसूक्ष्म सिंचनासाठी 100 कोटींची तरतूदअॅग्रो मार्केटसाठी 50 कोटींची तरतूदपंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी 125 कोटींची तरतूदकृषी पंप जोडणीसाठी 979 कोटींची तरतूदकृषी उत्पन्न 2021 पर्यंत दुप्पट करणार, शेतकरी गट स्थापन करणार , 20 शेतकरीचा एक गट, 200 कोटी रुपये तरतूद , प्रकल्प यशस्वी झाल्यास पैसे कमी पडू देणार नाहीमराठवाड्यास पाणी प्रकल्प 250 कोटीजलसंपदा विभागास 2017-18 मध्ये 8233 कोटी भरीव तरतूद
जलयुक्त शिवार 1600 कोटी आतापर्यंत दिला, 2017- 18- 1200 कोटी प्रस्तावितज्यांना हा अर्थसंकल्प ऐकायचा नाही , त्यांना अर्थसंकल्प यापुढे ऐकायला सदनात पाठवू नको5.4 महाराष्ट्राचा विकास दर हा यांचं (विरोधकांचं) कर्तृत्व, विकासदर पुढल्या वर्षी दोन अंकी करण्याचा आपला विचार आहेशेतकरी बांधवांनो हे सरकार तुमच्या पाठिशीशेतकऱ्यांच्या भरीव योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूदशेतकरी जगाचा पोशिंदा, त्यामुळे कृषी क्षेत्रातील समस्या सोडवणं सरकारची जबाबदारीमहाराष्ट्राचा विकासदर पुढल्या वर्षी दोन अंकी करण्याचा आपला विचार आहेशेतकरी बांधवांनो, सरकार तुमच्या पाठीशी आहेअर्थसंकल्प सादर होत असताना विरोधकांचा प्रचंड गदारोळ