
मुंबई/नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेतील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या १६ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या सर्व जागांसाठी १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून, २२ जूनला निकाल घोषित केले जाणार आहेत. त्याचबरोबर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे.
राज्यातील अनेक जागांचा कार्यकाळ संपल्यामुळे या निवडणुका होत आहेत. काही जागा मागील काही वर्षांपासून रिक्त असल्याने या निवडणुकांकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
नागपूरची पोटनिवडणूक ठरणार प्रतिष्ठेची-
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे विधानसभा सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर नागपूर विधान परिषद जागा रिक्त झाली होती. आता या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
विदर्भातील राजकारणात नागपूरचा प्रभाव मोठा असल्याने भाजपसह काँग्रेस आणि इतर पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतांचे गणित लक्षात घेता ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे-
२५ मे – अधिसूचना प्रसिद्ध
१ जून – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
२ जून – अर्जांची छाननी
४ जून – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत
१८ जून – मतदान
२२ जून – मतमोजणी व निकाल
२५ जून – निवडणूक प्रक्रिया पूर्ण
आयोगाच्या अटी पूर्ण झाल्यानंतर निर्णय-
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील पोटनिवडणूक घेण्यासाठी किमान ७५ टक्के संस्था आणि मतदार प्रतिनिधी कार्यरत असणे आवश्यक असते. महाराष्ट्रात या अटी पूर्ण झाल्यानंतर आयोगाने नागपूर पोटनिवडणुकीला हिरवा कंदील दिला.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, विशेषतः नागपूरमधील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
गर्लफ्रेंड को घुमाने के लिए बना बाइक चोर, आरोपी गिरफ्तार ...#nagpurnews
सेवानिवृत्त उप जिलाधिकारी के घर में हुई चोरी का खुलासा #NagpurNews #CrimeNews...
गौरक्षण आश्रम के बाहर खड़ी कार का कांच तोड़कर चोरी ...#maharashtranews #vidarbhanews...
इथेनॉल विवाद पर बढ़ा सियासी संग्राम #nagpurnews #ethenol #nitingadkari #bjp #cybercrime #latestnews
स्मार्ट मीटर मुद्दे पर शिवसेना का ज्ञापन ... #maharashtranews #vidarbhanews #nagpurnews #newsupdate




