Published On : Wed, May 30th, 2018

यंदा बारावीचा निकाल घसरला ; ८८.४१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल ८८.४१ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या संख्येमध्ये एक टक्क्यांनी घट झाली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शकुंतला काळे यांनी ही माहिती दिली. परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 92.36 टक्के इतका लागला आहे. तर 85.23 टक्के मुलं पास झाली आहेत.

एकूण १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक म्हणजेच 94.85 टक्के इतका निकाल लागला आहे. तर सर्वात कमी नाशिक विभागाचा 86.13 टक्के इतका निकाल लागला आहे.

विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल १ वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

विभागनिहाय टक्केवारी-
कोकण – ९४.८५
पुणे – ८९.५८
नागपूर – ८७.५७
औरंगाबाद – ८८.७४
मुंबई – ८७.४४
कोल्हापूर – ९१.००
अमरावती – ८८.०८
नाशिक – ८६.१३
लातूर – ८८.३१