Published On : Sat, Mar 25th, 2017

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १९ आमदारांचं निलंबन रद्द होण्याची शक्यता

Advertisement


मुंबई:
विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना गोंधळ घालणा-या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ आमदारांचं केलेलं निलंबन रद्द होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या आमदारांचं निलंबन मागे घेण्यास सरकार सकारात्मक असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत दिली आहे.

विधानपरिषदेत शनिवारी लेखानुदान मंजूर झालं. त्यामुळे सरकार आमदारांचा निलंबन मागे घेण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २९ मार्चला विधीमंडळाचे कामकाज सुरू होणार आहे. त्यावेळी आमदारांचे निलंबन रद्द केलं जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अर्थसंकल्पादरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ घालणा-या काँग्रेसच्या ९ आमदारांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० आमदारांचं ९ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. या आमदारांवर सभागृहाचा अवमान करणे आणि अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे असे आरोप ठेवण्यात आले होते.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

निलंबित करण्यात आलेल्या आमदरांची नावे

काँग्रेसचे निलंबित आमदार
अमर काळे – काँग्रेस, आर्वी मतदारसंघ, वर्धा
विजय वडेट्टीवार – काँग्रेस, ब्रह्मपुरी, चंद्रपूर
हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस, बुलडाणा
अब्दुल सत्तार – काँग्रेस, सिल्लोड, औरंगाबाद
डी.पी. सावंत – काँग्रेस, नांदेड उत्तर
संग्राम थोपटे – काँग्रेस, भोर, पुणे
अमित झनक – काँग्रेस, रिसोड, वाशिम
कुणाल पाटील – काँग्रेस, धुळे ग्रामीण
जयकुमार गोरे – काँग्रेस, माण – सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार
भास्कर जाधव – राष्ट्रवादी- गुहागर मतदारसंघ, रत्नागिरी
जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी, कळवा, ठाणे
मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड, परभणी
संग्राम जगताप – राष्ट्रवादी, अहमदनगर
अवधूत तटकरे – राष्ट्रवादी, श्रीवर्धन, रायगड
दीपक चव्हाण – राष्ट्रवादी, फलटण सातारा
नरहरी जिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरी, नाशिक
वैभव पिचड- राष्ट्रवादी, अकोले अहमदनगर
राहुल जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीगोंदा अहमदनगर
दत्तात्रय भरणे – राष्ट्रवादी काँग्रेस, इंदापूर, पुणे

Advertisement
Advertisement