Published On : Wed, Jun 6th, 2018

महाराष्ट्राला ‘बेस्ट बायर्स’ राज्याचा पुरस्कार

Advertisement

नवी दिल्ली : देशात बेस्ट बायर्स राज्य म्हणून महाराष्ट्राचा आज राजधानीत गौरव झाला. राज्याच्या औद्योगिक विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात देशात ‘गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस’ (जीइएम) चा प्रभावी वापर करून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यांचा आज सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग विभागाच्या सचिव रिता तेवतिया यांच्या हस्ते महाराष्ट्राला ‘बेस्ट बायर्स’ राज्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला, डॉ. हर्षदीप कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्यावतीने ‘गव्हर्नमेंट इ मार्केटप्लेस’ (जीईएम) च्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी व विक्रीसाठी विशेष मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. जीईएम च्या माध्यमातून देशातील सरकारी व गैरसरकारी संस्था खरेदी व विक्रीचे व्यवहार करतात. महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागाने केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयासोबत जीईएम या सेवेसाठी सामंजस्य करार केला व या माध्यमातून झालेल्या खरेदी व्यवहारामुळे महाराष्ट्र देशात ‘बेस्ट बायर्स’ राज्य ठरले आहे. जीइएम या व्यवस्थेच्या माध्यमातून देशात उद्योग क्षेत्रातील खरेदी व विक्रीच्या व्यवहाराला गती आली आहे. तसेच, पादर्शक व्यवहारामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे.

Advertisement
Advertisement