नागपूर: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ( Maharashtra Day ) ५९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बुधवारी (ता. १) नागपूर (Nagpur) महानगरपालिका मुख्यालयातील हिरवळीवर महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, उपायुक्त नितीन कापडणीस, सहायक आयुक्त महेश धामेचा, राजू भिवगडे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरीता कामदार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) सुनील कांबळे, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, राजू राहाटे, गिरीश वासनिक, अविनाश बाराहाते, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, निगम अधीक्षक मदन सुभेदार आदी उपस्थित होते. यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. आभार सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी केले. यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी, जवान उपस्थित होते.
