Published On : Sat, Jun 21st, 2025
By Nagpur Today Nagpur News

वारकऱ्यांच्या सान्निध्यात ‘भक्तियोग’चा योग; मुख्यमंत्र्यांचा पुण्यात सहभाग

पुणे : जागतिक योग दिन २०२५ निमित्त महाराष्ट्रभर विविध ठिकाणी योगाचे आयोजन झाले. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विशेष ‘भक्तियोग’ कार्यक्रम पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योग सत्रात वारकऱ्यांसोबत सहभाग घेतला.

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या सध्या पुण्यात मुक्कामी आहेत. त्या पार्श्वभूमीवर योग आणि अध्यात्माचा संगम साधत ‘भक्तियोग’ या नावाने अनोखा कार्यक्रम राबवण्यात आला.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुख्यमंत्री म्हणाले, “वारकऱ्यांच्या उपस्थितीत योग सत्र होणे ही एक अद्वितीय भावना आहे. संपूर्ण राज्यातील ७०० हून अधिक महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी योगाभ्यास झाला.”

कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, राजेश पांडे, विद्यापीठाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते. योग सत्रात विविध दिंड्यांतील भाविकांनीही सहभाग घेतला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत योग दिन साजरा करताना सांगितले की, “योग हा आपल्या संस्कृतीचा भाग असून, दररोजच्या जीवनाचा तो अविभाज्य घटक व्हावा.”

राज्यात सर्वत्र शाळा, महाविद्यालये, सरकारी व खासगी आस्थापनांमध्ये सामूहिक योग सत्र, प्रात्यक्षिके व जनजागृती उपक्रम पार पडले.

Advertisement
Advertisement