Published On : Sat, Jun 21st, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील शासकीय जमिनीवर डोळा; कमलेश चौधरीविरोधात बनावट दस्तऐवज प्रकरणी गुन्हा दाखल

- ज्वाला धोटे यांची मागणी MCOCA अंतर्गत कारवाईची मागणी
Advertisement

नागपूर – फूटाळा तलावाच्या अतिक्रमण प्रकरणात चर्चेत असलेल्या कमलेश दिलीप चौधरीने आता सिटी सर्व्हेचे बनावट दस्तऐवज तयार करून शासकीय जमिनीवर बळकाव करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिटी सर्व्हे कार्यालय क्र. ३ च्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, बनावट दस्तऐवजाच्या आधारे मौजा तेलंगखेडी येथील तब्बल ४३.८७ लाख चौ.फुट (सुमारे ४०,७७३९.१ चौ.मी.) क्षेत्रफळाची शासकीय जमीन बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

Gold Rate
20 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,200/-
Gold 22 KT ₹ 1,22,900 /-
Silver/Kg ₹ 2,03,400/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या जमिनीचे मालकी हक्क महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडे असून, माफसू, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV) आणि ICMR/नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर वन हेल्थ यांचे अधिकृत हक्क या नोंदींमध्ये स्पष्ट आहेत.

कमलेश चौधरीने २१ जानेवारी २०२५ रोजी सिटी सर्व्हे कार्यालयात अर्ज सादर करताना, त्याच्या वडिलांचे नाव पट्टेदार म्हणून दर्शवले होते. मात्र, तपासणीत दस्तऐवज बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने अर्ज फेटाळण्यात आला.

आधीच अतिक्रमणाचे गुन्हे-
कमलेश चौधरीविरोधात यापूर्वीही फूटाळा तलाव व कॅचमेंट क्षेत्रातील तीन अतिक्रमण प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. हे चौथे प्रकरण असून, यामध्ये त्याने थेट बनावट शासकीय दस्तऐवज तयार केल्याने गुन्ह्याचे स्वरूप अधिक गंभीर आहे.

धोटे यांची MCOCAची मागणी-
या प्रकरणात अन्याय निवारण मंचच्या अध्यक्षा ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. आता त्यांनी कमलेश चौधरीविरोधात MCOCA अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शासकीय दस्तऐवज बनावट करून नागपूर महानगरपालिका, नगर विकास विभाग, सिव्हिल कोर्ट, जिल्हा न्यायालय व उच्च न्यायालयात सादर करून तो संपूर्ण यंत्रणेला फसवत आहे. अशा व्यक्तीविरोधात MCOCAचा वापर करून अटक करावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत कोठडीत ठेवावे,” असे ज्वाला धोटे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

राजकीय पातळीवरही हालचाली-
या प्रकरणाची दखल घेत आमदार विकास ठाकरे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement