Published On : Wed, Apr 22nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्र उष्णतेच्या संकटाविरुद्ध सज्ज; आयआयएम नागपूरमध्ये ‘हीट रेझिलियन्स’ उत्कृष्टता केंद्र सुरू

Advertisement

नागपूर : राज्यात वाढत्या उष्णतेच्या लाटा आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयआयएम नागपूर येथे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हीट रेझिलियन्स अँड सस्टेनेबल कूलिंग’चे उद्घाटन केले. सह्याद्री अतिथीगृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा कार्यक्रम पार पडला.

हे केंद्र राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या (SIDM) महत्त्वाच्या घटकाप्रमाणे कार्य करणार असून, उष्णतेच्या लाटा आणि वाढत्या तापमानाशी संबंधित समस्यांवर वैज्ञानिक उपाय शोधण्यास मदत करणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, हवामान बदलाचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसत असून, विशेषतः अल्पभूधारक शेतकरी मोठ्या संकटात सापडत आहेत. विदर्भासह अनेक भागांमध्ये तापमान वाढल्याने शाळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि उष्णतेच्या लाटांमुळे ग्रामीण व शहरी भागातील अडचणी अधिक तीव्र झाल्या आहेत.

या नव्या केंद्राच्या माध्यमातून ‘उष्णता कृती योजना’ आणि ‘शहरी हवामान कृती योजना’ यावर विशेष भर दिला जाणार आहे. निवडक शहरे व जिल्ह्यांना तांत्रिक मदत देऊन उष्णतेशी मुकाबला करण्याची क्षमता वाढवली जाणार आहे.

Advertisement

यासोबतच, केवळ योजना तयार करून थांबणार नाही, तर त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य कर्मचारी, प्रशासन आणि नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. बांधकाम क्षेत्रात पर्यावरणपूरक साहित्य वापरून उष्णतेत शीतकरणासाठी लागणाऱ्या विजेचा वापर कमी करण्यावरही भर दिला जाणार आहे.

शाश्वत विकासाचा विचार पुढे नेत महाराष्ट्र ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.