Published On : Tue, May 8th, 2018

पोलीस भरतीसाठी आलेल्या चार तरुणींना कारने उडवले

मुंबई : सध्या महाराष्ट्र पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु झाली असून, यासाठी आलेल्या चार तरुणींना एका कारने उडवले आहे. या अपघातात चारही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काजल करडे, दीपाली काळे, चित्राली पांगे, चैताली दोर्गे अशी जखमी या तरुणींची नावे असून, हा अपघात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विक्रोळीत आज तरुणींची पोलीस भरती प्रक्रिया सुरु होती. यासाठी द्रुतगती मार्गावर सर्व्हिस रोडवर शारिरीक चाचणी सुरु होती. भरती प्रक्रिया संपल्यानंतर तरुणी विक्रोली स्थानकाच्या दिशेने जात असताना टाटा झेन कारने त्यांना उडवलं. अपघातात तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना महात्मा फुले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Advertisement

दरम्यान दीपाली काळे या तरुणीला जास्त दुखापत झाली आहे. तिला सायनच्या टिळक रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या प्रकरणी चैतालीनं विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतलं आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement