Published On : Wed, Oct 10th, 2018

श्री महालक्ष्मी मंदिर कोराडी आज अखंड मनोकामना महाज्योत प्रज्वलित होणार आजपासून नवरात्रोत्सव

Advertisement


नागपूर: महालक्ष्मी मंदिर कोराडी येथील मंदिरात उद्यापासून   अश्विन नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असून यावर्षीपासून एकच अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात येत आहे. उद्या बुधवार दिनांक 10 रोजी सायंकाळी 5 वाजता अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे.

यंदापासून भाविकांसाठी अखंड मनोकामना ज्योत सुविधा मंदिर व्यवस्थापनातर्फे सुरु करण्यात आली आहे. एकच ज्योत आई जगदंबेसमोर प्रज्वलित करण्यात येईल. ही अखंड ज्योत वर्षभर तेवत राहणार आहे. आई जगदंबेच्या मूर्तीसमोर आपल्या नातेवाईक, परिचितांच्या नावाने वर्षभर अखंड ज्योत प्रज्वलित करता येणार आहे. यासाठी 1 वर्षाला 2100 रुपये, 5 वर्षाकरिता 11 हजार रुपये, 11 वर्षाकरिता 21 हजार रुपयेण 21 वर्षाकरिता 51 हजार रुपये, 31 वर्षाकरिता 1 लाख रुपये, 51 वर्षाकरिता 2 लाख आणि आजीवन अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलन करणयासाठ़ी 2 लाख 50 हजार रुपये एवढी सहयोग राशी आपण जमा करू शकता. अधिक माहितीसाठी भाविकांनी कोराडी मंदिर कार्यालयाशी मोबाईल क्रमांक 9907979222, 9607979555 या क्रमांकावर संपर्क करू शकता.

Advertisement

नवरात्रोत्सवाची सुरुवात उद्या दिनांक 10 रोजी होणार असून स्वयंभू दर्शन पहाटे 4 ते 10 पर्यंत, घटस्थापना व श्रृंगार आरती सकाळी 10 ते 12, भोग आरती दुपारी 12 वाजता. अखंड महाज्योत प्रज्वलन सायंकाळी 5 वाजता आणि संध्या आरती रात्री 8 वाजता होईल.

कोराडी परिसर सज्ज

उद्यापासून सुरु होणार्‍या नवरात्रोत्सवासाठ़ी श्री. महालक्ष्मी मंदिर परिसर सर्व व्यवस्थांनी सज्ज झाला आहे. या दरम्यान सुमारे 10-15 लाभ भाविक या उत्सवात सहभागी होतात. विविध शासकीय विभागांकडून दिलेल्या जबाबदार्‍या संबंधित अधिकारी पार पाडण्यासाठी सज्ज आहेत. जिल्हा प्रशासनाचे संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष असून चोख पोलिस बंदोबस्त आणि सीसीटीव्हीच्या निगराणीतून सर्व भाविकांना प्रवेश करावा लागणार आहे. पार्किंगपासून सर्व व्यवस्था चोख ठेवण्यात आल्या आहेत.