रिच – ४ व्हायाडक्टचे ७९ % कार्य पूर्ण
नागपूर : महा मेट्रोच्या सिताबर्डी ते प्रजापती नगर कॉरीडोर चे कार्य जलद गतीने सुरु असून, महा मेट्रो द्वारे या मार्गावर रूळ टाकण्याच्या कार्य देखील सुरुवात करण्यात आले आहे. रिच – ४ या एकूण ८.३० की.मी.एवढ्या मेट्रो मार्गावर रूळ बसविण्याचे कार्य सुरु झाले आहे.
तसेच या मार्गावरील निर्माण कार्यदरम्यान लावण्यात आलेले बहुतेक भागातील बॅरिकेडस हटविण्यात आले आहे. प्रकल्पाचे काम सुरु असतांना त्या भागातून प्रवास करणाऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून बॅरिकेडस उभारण्यात आले होते. पण अनेक भागातील प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असल्याने त्या भागातील बॅरिकेडस काढण्यात आले आहे.
सिताबर्डी ते प्रजापती नगर दरम्यान असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या कामाने वेग घेतला असून व्हायाडक्टचे ७९ % कार्य पूर्ण झाले आहे. सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.३० किमीच्या या मार्गावर एकूण ०९ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे स्टेशनची नावे या प्रमाणे कॉटन मार्केट,नागपूर रेल्वे स्टेशन,दोसर वैश्य चौक,अग्रसेन चौक, चितार ओळी, टेलीफोन एव्सचेंज चौक, आंबेडकर चौक वैष्णोदेवी चौक,प्रजापती नगर.
नागपूरच्या पूर्व आणि पश्चिम नागपूर भागांना सेंट्रल एव्हेन्यू हा एक प्रमुख मार्ग आहे. या मेट्रो मार्गिकेला लागून गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ इत्यादी असे प्रमुख व्यापारिक क्षेत्र आहे. वाहतुकीची सुविधा या क्षेत्राकरता महत्वाची असून, मेट्रो रेल सेवेच्या माध्यमाने निश्चितच हे पूर्ण होणार आहे. नागपूरचा सेन्ट्रल एव्हेन्यू परिसर व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन येथून होते.नागपूर शहराचा विस्तार होत असतांना या मार्गवरील वाहतूक देखील सातत्याने वाढली. बाजारपेठ वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबवतांना मेट्रोने पुरेपूर काळजी घेतली.
या मार्गीकेवरील प्रवासी सेवा सुरु झाल्यावर मेयो हॉस्पिटल,रेल्वे स्थानक,कॉटन मार्केट,इतवारी बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाणे सोईस्कार ठरेल.
आतापर्यंत झालेल्या कार्याची अधिकृत आकडेवारी पुढील प्रमाणे आहे :
पाईल्स १२८४ पैकी १२८४, पाईल कॅप २५० पैकी २५०,पियर २७६ पैकी २३२, पियर कॅप २४२ पैकी २०७,पियर आर्म ४५ पैकी ४५, ट्रॅक आर्म ४४ पैकी ३२, सेग्मेंट इरेव्क्शन २४९१ पैकी २१२०, सेग्मेंट कास्टिंग २४९१ पैकी २३८७, झाले असून असून गर्डर लाँचिंग चे कार्य प्रगतीपथावर आहे.

