Published On : Sat, Oct 23rd, 2021

*महा मेट्रोला एक्ससेलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्टचा पुरस्कार जाहीर

उत्कृष्ट मल्टिमॉडेल इंटिग्रेशनच्या अंमलबजावणी करिता महा मेट्रोची निवड

नागपूर : भारत सरकारच्या, गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय द्वारे महा मेट्रोला एक्ससेलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्टचा पुरस्कार जाहीर झाला असून सदर पुरस्कार २९ ऑक्टोबर २०१९ रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री गृहनिर्माण आणि शहरी विकास श्री. हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. मल्टिमॉडेल इंटिग्रेशनची उत्कृष्टरित्या अंमलबजावणी करण्याकरिता महा मेट्रोची यामध्ये निवड करण्यात आली आहे. अर्बन मोबिलिटी इंडियाच्या वतीने देशातील मेट्रो रेल प्रकल्पामध्ये मध्ये उत्कृष्ट मल्टीमॉडेल इंटिग्रेशन अवार्ड करिता प्रवेशिका मागविण्यात आली होती व सदर माहिती व प्रस्तुतीकरण लिखित स्वरूपात मागविण्यात आले होते.

या पुरस्काराच्या पॅनेल मध्ये देशातील वाहतूक क्षेत्रातील तद्ध गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय, भारत सरकारचे अधिकारी,सेंटर फॉर एक्सेलन्स अहमदाबादचे शिवानंद स्वामी, जागतिक संसाधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष तसेच इतर तज्ञचा या पॅनल मध्ये समावेश होता.महा मेट्रोच्या वतीने नागपूर शहरात राबविण्यात येत असलेल्या मल्टिमॉडेल इंटिग्रेशनचा विस्तृत आराखडा व सादरीकरण या पॅनल समोर सादर करण्यात आला.

मुख्य उद्दिष्ट :
महा मेट्रोने काँफ्रेहेन्सिव्ह फिडर सर्विस /प्लॅनिंगची योजना आखत प्रकल्पा सोबत नियोजन करून त्याची अंबलबजावणी केली ज्यामध्ये नागपूर मेट्रो भारतात प्रथम शहर आहे. नागपूर शहरात मेट्रो सेवा, सिटी बस, मध्यवर्ती सार्वजनिक वाहतूक, ई-रिक्षा, ई – बाईक, ऑटो, सायकल,ईलेव्कट्रीक स्कुटर, मेट्रो फिडर सेवा इत्यादी शहरातील प्रमुख परिवहनाचे साधन आहे. महा मेट्रोने या सेवांना मेट्रो स्टेशन सोबत सर्व उपलब्ध साधनाचे एकत्रीकरण करण्याची योजना आखली. शहरातील प्रवाश्याना जलद, सुरक्षित, शाश्वत आणि परवडणारा मार्ग उपलब्ध करून देण्याचा या मागचा मुख्य हेतू आहे.

महा मेट्रोने केलेल्या उपाय योजना :
महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पामध्ये मेट्रो स्थानकांवरील सुविधांच्या नियोजनाचा समावेश आहे, ज्यामध्ये मेट्रो स्टेशन प्रवेश आणि निर्गमन जवळ मेट्रो फीडर आणि सार्वजनिक वाहतूक बसेसच्या तरतुदीसह पिक-अप/ड्रॉप ऑफ बे तसेच शासनाने शिफारस केलेल्या धोरणांनुसार पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र फूटपाथ आणि सायकल ट्रॅक, सायकल पार्किंग, दुचाकी आणि कार पार्किंग, दिव्यांगजन पार्किंग तसेच मेट्रो ट्रेन मध्ये सायकल सोबत नेण्याची उपाय योजना या संदर्भात तरतूद करण्यात आली आहे.


गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय,भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा एक्ससेलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्टचा हा पुरस्कार महा मेट्रो आणि नागपूर शहराकरिता अभिमानाची बाब आहे.