कठीण काळात महा मेट्रोची सर्वोत्कृष्ट कामगिरी
नागपूर: “जेव्हा परिस्थिती सर्वात कठीण असते तेव्हा सर्वोत्तम कामगिरी करणे ही सर्वात कठीण बाब आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण असून सुद्धा महा मेट्रोच्या नागपूर आणि पूर्ण मेट्रो रेल प्रकल्पाने मार्च २०२१ आणि वित्त वर्ष २०२० – २१ मध्ये निर्माण कार्य व आर्थिक प्रगती अचूकपणे साध्य केली आहे. हे यश फाइव्ह डायमेंशनल बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (5 डी बीम) प्रणालीच्या वापरामुळे शक्य झाले. कठीण परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल समाधान व्यक्त करत या संबंधी गौरवपूर्ण उद्दगार महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केले.
महा मेट्रोने मार्च २०२१ मध्ये ६८५ कोटी रुपये इतका खर्च केला. २०२०-२१ या आर्थिक वर्षात तब्बल ३,३०३ कोटी रुपये इतका खर्च प्रकल्पाच्या कामावर केला. यापूर्वी मार्च २०१९ चा खर्च हा ६६९ कोटी रुपये एवढा असून २०१८-१९ वर्षात हा खर्च २,८९४ कोटी रुपये एवढा होता. महा मेट्रोने मागील सर्व रेकॉर्ड मोडत हे सिद्ध केले कि, कोरोना काळात देखील इच्छा शक्ती असल्यास निर्धारित लक्ष्यांवर मात करता येते. मार्च २०१९ च्या तुलनेत मार्च २०२१ मधील खर्चाची टक्केवारी २.३९ % एवढी होती तर सन २०१८-१९ च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये ही वाढ १४.१३% एवढी होती. ५डी-बीम प्रणालीच्या माध्यमाने हे शक्य झाले आहे.
•समन्वय साधून मेट्रो समूहाने यश प्राप्त केले:* महा मेट्रोने रेकॉर्ड कामगिरी केल्याबद्दल संचालक (प्रकल्प) श्री. महेश कुमार यांनी सांगितले कि, कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशभर असतानाही गंभीर आव्हांनाना समोर जात स्टेशन, व्हायाडक्ट, डबलडेकर पूल आणि ट्रॅकचे निर्माण कार्य महा मेट्रोने पूर्णत्वास नेले. मेट्रोच्या प्रमुख अधिकाऱ्याना या दरम्यान विशेष काम सोपविण्यात आले होते. बांधकाम कामगारांनी भारत सरकारच्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन केले. कामगार, कर्मचारी आणि अभियंता यांच्या उंच मनोबलामुळेच आणखी एक कार्य यशस्वीरीत्या साध्य होण्यास मदत झाल्याचे मत श्री. कुमार यांनी व्यक्त केले.
•देशव्यापी लॉकडाऊन मध्ये सुद्धा मेट्रोने सर्वोत्कृष्ट प्रगती केली:* देशव्यापी लॉकडाऊन असूनही कामगारांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये चांगले कार्य करत निर्माण कार्य व आर्थिक प्रगती सर्वोत्कृष्ट साध्य केली असे विचार संचालक (वित्त) श्री. एस शिवमाथन यांनी व्यक्त केले. सन २०२० -२१ मध्ये सर्वात मोठा रोख खर्च ३३००३ कोटी एवढा असून २०१८ – १९ मध्ये २८९४ कोटी पेक्षा जास्त होता. हे सर्व योग्य नियोजन, कामगारांची योग्य देखभाल, अन्न, निवारा आदी कामांमुळे शक्य झाले असे मत श्री. शिवमाथन यांनी व्यक्त केले.
•निर्माण कार्य करताना कामगारांच्या सुरक्षिततेत कुठलीही तडजोड नाही:* “उत्कृष्ट कामगिरीमुळे विक्रम प्रस्थापित करणे शक्य झाले असल्याची ग्वाही संचालक (रोलिंग स्टॉक) श्री.सुनील माथूर यांनी दिली. कुणावरही ओझे न बाळगता कार्य वितरित केले, कार्य करताना हे सुनिश्चित केले की कामगारांच्या सुरक्षिततेशी कुठली ही तडजोड नको . “उत्कृष्ट कामगिरीमुळे विक्रम करणे शक्य झाले असल्याची ग्वाही संचालक (रोलिंग स्टॉक) श्री.सुनील माथूर यांनी दिली. कुणावरही ओझे न देता कार्य वितरित केले, कार्य करताना हे सुनिश्चित केले की कामगारांच्या सुरक्षिततेशी कुठली ही तडजोड नको.
कोविड -१९ मुळे संपूर्ण देशभर मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही, महा मेट्रोने २०२०-२१ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. २०२२-२२ मध्ये नागपूर व पुणे मेट्रो प्रकल्प उत्कृष्ट कार्य करीत आहे. डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा कठीण परिस्थिती असते तेव्हा कार्य करने आव्हानात्मक असते व ते मेट्रोला देखील लागू होते.










