Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jun 15th, 2019

  सौ. माधुरी प्रविण ठाकरे यांनी स्विकारला सभापतींचा पदभार

  हनुमान नगर झोन सभापती पदी नुकतीच प्रभाग क्रमांक ३४ च्या नगरसेविका सौ. माधुरी प्रविण ठाकरे यांची निवड झालेली असुन त्यांचा पदग्रहण सोहळा मान्यवराच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी प्रामुख्याने मा. महापौर सौ. नंदाताई जिचकार, मा.आ.श्री. सुधाकरजी कोहळे, अध्यक्ष भा.ज.पा., नागपूर शहर, सत्तापक्ष नेते मा.श्री. संदिपजी जोशी, उपमहापौर मा.श्री. दिपराजजी पार्डीकर , स्थायी समिती अध्यक्ष प्रदिपजी पोहाणे, भा.ज.पा. दक्षिण मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. संजयजी ठाकरे हे उपस्थित होते.

  सभापती पद हे एक अत्यंत जबाबदारीचे पद असुन मी सर्वांचे मार्गदर्शनात तसेच सहयोगी नगरसेवक व पदाधिकारी यांच्या सहकार्याने चांगले कार्य करण्याचे तसेच जनतेच्या समस्या सोडविणार असल्याचे यावेळी नवनियुक्त सभापती सौ. माधुरी प्रविण ठाकरे यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले.

  यावेळी मा. महापौर सौ. नंदाताई जिचकार, दक्षिण मतदार संघाचे आमदार मा.आ.श्री. सुधाकरजी कोहळे, मा.श्री.देवेंद्रजी दस्तुरे, सौ. निताताई ठाकरे, मा.श्री. विजयजी आसोले, दक्षिण मंडळाचे महामंत्री मा.श्री. विलास करांगळे, मा.श्री. किशोर पेठे, श्री. प्रशांत कामडे, श्री.सुनिल मानेकर व उपस्थित मान्यवरांनी सभापती पदाच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या व चांगले काम होईल व जनतेच्या समस्या सोडविल्या जातील अशा अपेक्षा व्यक्त केल्या.

  याप्रसंगी मा. नगरसेवक व नगरसेविका डॉ. रविंद्र भोयर, श्री. सतिश होले, सज्ञै. दिव्याताई धुरडे, सौ. स्वातीताई आखतकर, सौ. रिताताई मुळे, श्री. विजय झलके, श्री. नागेश सहारे, श्री. अभय गोटेकर, श्री. दिपक चौधरी, श्री. राजेंद्र सोनकुसरे, श्री नागेश मानकर, श्री. भगवान मेंढे, सौ. रुपालीताई ठाकुर, सौ. मंगलाताई खेकरे, सौ. स्नेहलताई बिहारे, श्रीमती, उषाताई पॅलेट, सौ. यिातलताई कामडे, सौ. कल्पनाताई कुंभलकर, सु.श्री. वंदनाताई भगत, सौ. विशाखाताई बान्ते, सौ. भारतीताई बुंदे, सौ. विद्याताई मडावी, सौ. लिलाताई हाथीबेड, प्रभागाचे अध्यक्ष मनिष फाये, विकास वाबरे, डॉ राजेश गादेवार, श्री. शिवनाथ बन्सोड, श्री. अनिल चरपे, श्री. रवि अंबाडकर, श्री. सोमलकर सर, श्री. विनोद कडु, श्री. रमेश कानगो भा.ज.पा. चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145