Advertisement
नागपूर : म.न.पा. च्या डॉ. राममनोहर लोहिया माध्यमिक शाळेतील शासनाच्या समग्र शिक्षा अभियान योजने अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण विभाग मनपा चे शिक्षणाधिकारी श्री. राजेंद्र पुसेकर तसेच शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. गीता दांडेकर यांच्या हस्ते विद्यार्थी निरजकुमार साहू (इयत्ता १० वी), नंदिनी विंचूरकर, सक्षम राउत (इयत्ता ९ वी) व अर्णव सलामे (इयत्ता ६ वी) प्रत्येकी रु.६०००/- तसेच नंदिनी विंचूरकर या दिव्यांग विद्यार्थिनीला प्रोत्साहन भत्ता म्हणून रु.२०००/- रोख रक्कम प्रदान करण्यात आली. याप्रसंगी युआरसी ४ मधून सौ. वंजारी आणि सौ. श्रावणकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
Advertisement