Published On : Tue, Jan 22nd, 2019

एम. के. एच. संचेती पब्लीक स्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे मॉक ड्रील/ईव्हॅकेशन ड्रिल संपन्न

दरवर्षी केन्द्रीय गृह मंत्रालय व महाराष्ट्र शासन अग्निशमन सेवा संचालनालयातर्फे प्राप्त झालेल्या निर्देशानुसार यांच्या मार्फत राष्ट्रीय स्तरावर शहरातील एका शाळेमध्ये मॉक ड्रिल घेण्याबाबतचे निर्देश प्राप्त होत असतात. त्यानुसार हिन्दुस्थान कॉलनी, वर्धा रोड येथील एम. के. एच. संचेती पब्लीक स्कुल व ज्युनिअर कॉलेज या शाळेची निवड करण्यात आली. त्यानुसार आज दि. 21.01.2019 रोजी ठिक 11:00 वाजता एम. के. एच. संचेती पब्लीक स्कुल व ज्युनिअर कॉलेज हिन्दुस्थान कॉलनी वर्धा रोड येथे नागपूर महानगरपालिका अग्निशमन व आणिबाणी सेवा विभाग व आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेन्द्र उचके यांचे मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल व ईव्हॅकेशन ड्रिलचे आयोजन करण्यात आले.

शाळेतील विद्यार्थाच्या वेगवेगळया टिम , कम्युनिकेशन टिम, फायर टिम मेडीकल टिम, बचाव टिम तयार करण्यात आल्या व त्यांना सविस्तर माहिती देवून त्यांच्याकडून कवायती करण्यात आल्या.

ड्रिल ठिक 11:00 वाजता सुरू झाली व 11:05 समाप्त झाली. या 5 मिनिटामध्ये 2000 विद्यार्थ्यांनी शाळा रिक्त केली. सर्व विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात सुरक्षीत स्थळी आले. यावेळी शाळेचे व कॉलेजचे 150 शिक्षक व शिक्षिका व 25 शाळेतील स्टाफ उपस्थीत होते.

यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध प्रात्यक्षीक करून दाखविण्यात आले. ही ड्रिल संपन्न करण्याकरीता नरेन्द्रनगर स्थानकाचे स्थानक प्रमुख श्री. डि. एन. नाकोड, उपअग्निशमन अधिकारी श्री. सी. बी. तिवारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कार्य. सहा. स्थानाधिकारी श्री. के. आर. कोठे, श्री. सुनिल एस. राऊत तसेच नरेन्द्रनगर स्थानकाचे श्री. शरद दांडेकर, अतुल निबंर्ते, श्री. सिताराम डहाळकर, श्री. शंभरकर, श्री. धोपटे उपस्थीत होते. तसेच संचेती पब्लिक स्कुल या शाळेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष श्री. मोहनराव गंधे, संचालक मंडळाचे विश्वस्त श्री. अमित येनुरकर, श्रीमती रूचा येनुरकर तसेच एम. के. एच. संचेती पब्लीक स्कुलच्या प्राचार्या श्रीमती उमा भालेराव व सिटी प्रिमीयर कॉलेजचे प्राचार्य श्री. ओवीस तालीब व श्रीमती शितल कठाळे उपस्थित होते.