Published On : Fri, May 4th, 2018

भाजपालाही एक्सपायरी डेट आहे : राज ठाकरे

Chhagan Bhujbal and Thackeray
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भुजबळांच्या जामिनावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले भजुबळांना तुरुंगाबाहेर काढण्यात भाजपाचे राजकारण असले तरी भाजपालाही एक्सपायरी डेट असल्याचे जनतेला कळते.

पाच लाखांच्या जात मुचलक्यावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयानं शुक्रवारी जामीन मंजूर केला आहे. यामुळे, तब्बल दोन वर्षांनंतर छगन भुजबळ हे तुरुंगातून बाहेर येणार आहेत. जामीन मंजूर झाला असला तरी, भुजबळांच्या वकिलांना निकालाची प्रत सोमवारी मिळणार असल्याने सोमवारीच त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची चिन्ह आहेत.

सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली असता त्यानी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलाय. ‘भुजबळांवर करण्यात आलेल्या आरोपांवर चौकशीनंतर शिक्षा होईल… जामीन देण्यासाठी सरकारने उशीर लावला… कोर्टाने सांगितल्यानंतरही भाजप असे राजकारण करत असेल तर हे चुकीचे आहे… भाजपच्या फायद्यासाठी सरकार त्यांना बाहेर काढणार असतील तर हे लोकांनाही कळतं…पण, भाजपलाही एक्सपायरी डेट आहे’ अस म्हणत राज ठाकरेंनी राज्यातील भाजप सरकारवर टीका केली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement