Published On : Mon, Jul 23rd, 2018

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपीन मलिक, अवर सचिव महेश वाव्हळ, सहायक कक्ष अधिकारी शशिकांत ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.