Published On : Wed, Apr 20th, 2022
By Nagpur Today Nagpur News

लोकाधिकार परिषदेचे कामगार नेता माजी आमदार एस क्यू जमा यांना सामुहिक निवेदन सादर

Advertisement

कामठी:-लोकाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी कामगार नेते एस .क्यू. जमा यांची भेट घेऊन मैत्रेय उद्योग समूह मध्ये गुंतवणूक दारांची फसवणूक झाली त्याविरोधात जन आंदोलन उभारण्यासाठी समर्थनाची मागणी केली.

मैत्रेय उद्योग समुहाच्या चेअरमन वर्षा सत्पाळकर यांनी नागपूर जिल्ह्यातील ३००० महिला गुंतवणूकदार, प्रतिनिधी व देशभरातील २कोटी 16 लक्ष महिला गुंतवणूकदार, प्रतिनिधी यांची फसवणूक करून २:५ हजार कोटी रुपयाचा घोटाळा केला व कंपनी बंद केली. कंपनी बंद होऊन ६वर्ष पूर्ण झाली. त्या गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळालेले नाही. शासन -प्रशासनामध्ये कारवाईची नुसती फाईल फिरत आहे. कोर्टामध्ये पण तारीख पे तारीख “सुरू आहे.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मैत्रेय उद्योग समुहाच्या चेरमन वर्षा सत्पाळकर यांना पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आश्रय लाभला असून गुंतवणूकदार , प्रतिनिधी पैकी काही लोकांना हाताशी धरून वर्षा सत्पाळकर ह्या वेळ घालवत आहेत. ६ वर्षापासून ज्या सीनियर प्रतिनिधींनी ज्युनियर प्रतिनिधी व गुंतवणूकदार यांना सहकार्य करायला पाहिजे होतं ते आपल्या घरी गप्प बसले होते.

लोकाधिकार परिषदेच्या नेतृत्वात किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह होशियारी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ, यासारख्या अनेक शासन प्रशासनातील लोकांशी पत्र व्यवहार करून गुंतवणूकदारांमध्ये चेतना निर्माण करण्याचं काम केलं. तेव्हा मैत्रेय उद्योग समूहातील सीनियर प्रतिनिधीं ते पुन्हा सक्रिय झाले व खोट्यानाट्या बातम्या वर्तमानपत्रात प्रकाशित करून गुंतवणूकन प्रतिनिधीची दिशाभूल करत आहेत. गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेत. एकीकडे गुंतवणूकदार यापैकी ११लोकांनी आत्महत्या केले आहेत. दुसरीकडे गुंतवणूक दारांच्या घरावर पैशासाठी लोक रात्री-बेरात्री तुटून पडत आहेत. अशावेळी एका जनआंदोलनाची गरज आहे त्यासाठी सतत लोकाधिकार परिषदेचे अध्यक्ष किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांच्या सोबत मायाताई उके, सूर्यकांता घरडे ,सुनीता शेंडे, ज्ञानेश्वर उके यासारखे प्रतिनिधी सुद्धा अतिशय कष्ट करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement