नागपूर: लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह भाजपसह महायुतीचे नेते उपस्थित होते.
गडकरी यांच्यासोबतच रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी भाजपाकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.गडकरी आणि पारवे यांनी जिल्ह्याधिकारी कार्यालयात दाखल होण्याआधी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बख्त बुलंद शहा चौकात गोंड राजे बख्त बुलंद शाह यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
संविधान चौकातून मिरवणूक निघाली असून आकाशवाणी चौकात नितीन गडकरी जनतेला संबोधित केले. मिरवणुकीत भारतीय जनता पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, रिपब्लिकन पक्ष गट, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते प्रशांत पवार, लोक जनशक्ती पार्टीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष. सतीश लोणारे देखील उपस्थित होते.