मुंबई : २०१९ मधे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना नितीन बानुगडे पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तशी शिफारस केल्याची माहिती मिळाली आहे. जर पक्षप्रमुखांनी बानुगडे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली तर त्यांची टक्कर सरळसरळ राष्ट्रवादीचे वर्तमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी होणार आहे.
साताऱ्यात उदयनराजे विद्यमान खासदार आहेत. मात्र आपल्या स्वभावामुळे त्यांना पक्षातून विरोध असला तरी शरद पवार उमेदवार ठरवणार आहेत. तर भाजपतर्फे पुरुषोत्तम जाधव यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नितीन बानुगडे पाटील हे सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख आहेत.
तेच उदयनराजेंना टक्कर देऊ शकतात, असं मत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. मात्र अंतिम उद्धव ठाकरे हेच घेणार असल्याचं बोललं जात आहे.









