Published On : Thu, Apr 25th, 2024
By Nagpur Today Nagpur News

लोकसभा निवडणूक; शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रकाशित,’या’ मुद्द्यांचा समावेश

Advertisement

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी येत्या २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून आज निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्यात काही प्रमुख मुद्द्यांकडे शरद पवार गटाने लक्ष वेधले. यामध्ये गॅस-सिलेंडरच्या दरांपासून महिलांसाठीच्या आरक्षणापर्यंतच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

आज सकाळी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीरनामा प्रकाशित केला. शपथपत्रात समाजातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करू असं म्हणणं मांडलं आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती कमी करून ५०० रुपयांपर्यंत आणल्या जातील.

Gold Rate
2 May 2025
Gold 24 KT 93,700/-
Gold 22 KT 87,100/-
Silver/Kg 95,400/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गरज पडली, तर केंद्र सरकार त्यासाठी अनुदानही देईल, जसे पूर्वी यूपीएच्या काळात व्हायचे. पेट्रोल-डिझेलवरील करांची पुनर्रचना करू. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर मर्यादेत आणण्याचे काम होईल, असे जयंत पाटील म्हणाले.शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर शून्य जीएसटी केला जाईल. तसेच, अग्निवीर योजना रद्द करण्यासाठी काम होईल. महिलांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षणाचा मुद्दा जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे.

देशभरात ३० लाखाच्या आसपास रिक्त जागा आहेत. आम्ही सत्तेत गेल्यानंतर त्या भरण्याचा आग्रह करू. महिलांचे शासकीय नोकरीतलं आरक्षण ५० टक्के ठेवण्याचा आग्रह केला जाईल. जीएसटी देशातल्या लोकांना लुबाडण्याचं काम करतोय. त्याला मानवी चेहरा देण्याचं काम आवश्यक आहे. जीएसटीच्या बाबतीत केंद्र सरकारचा हस्तक्षेप मर्यादित केला जाईल, असेही पाटील म्हणाले.

Advertisement
Advertisement