Published On : Thu, Apr 25th, 2024

नागपुरातील कामठी येथे एकाच घरात तब्बल सव्वीस साप आढळल्याने खळबळ!

Advertisement

नागपूर : कामठी येथील एका घरात तब्बल सव्वीस साप आढळल्याने खळबळ उडाल्याची घटना समोर आली आहे.बिसन गोंडाणे याच्या घरी हे साप आढळून आले.

अगोदर गोंडाणे यांना घरी दोन साप दिसल्याने कुटुंबीय खूप घाबरले. त्यांनी तातडीने वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटीचे सदस्य सर्पमित्र सागर चौधरी यांना ही माहिती दिली. ते सर्पमित्रांना घेऊन घटनास्थळी पोहचले.

सापांना पकडण्यास सुरवात केली.चौधरी त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी साप पकडण्यास सुरुवात केली. यावेळी जमिनीतून थोडा गाळ काढल्यानंतर सागरने आणखी सापांना पहिले. पाहता पाहता यादरम्या तब्बल २६ साप त्यांनी बाहेर काढले. हे सर्व साप पांदीवड प्रजातीचे असून ते बिनविषारी असल्याची माहिती त्यांनी दिली. चौधरी यांनी या सर्व सापांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. त्यानंतर गोंडाणे कुटुंबीयांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

नागपुरात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे सापाच्या वारुळात पाणी आणि माती जमा होते. त्यामुळे ते बाहेर येतात आणि नवीन जागा शोधतात. थंड वातावरणामुळे ते वारुळातून बाहेर निघून अशा घरांमध्ये शिरले असल्याचे सर्पमित्र चौधरी म्हणाले.