Published On : Fri, May 17th, 2019

लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने कळमना मार्केट यार्ड 22, 23 व 24 मे रोजी बंद

सर्व संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन

नागपूर: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 नागपूर व रामटेक निर्वाचन क्षेत्रातील मतमोजणी दिनांक 23 मे 2019 रोजी कळमना मार्केट यार्ड येथे होत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने समितीचे कळमना मार्केट यार्ड अंतर्गत सर्व बाजार दिनांक 22 मे 2019 रेाजी सकाळी 8.00 ते दिनांक 24 मे 2019 रोजी सायंकाळपर्यंत व्यवहार बंद राहतील. तसेच दिनांक 21 मे 2019 रोजी सायंकाळी 7 ते दिनांक 24 मे 2019 रोजी सायंकाळपर्यंत कोणतीही व्यक्ती व वाहनास बाजार आवारामध्ये प्रवेश मिळणार नाही. तरी सर्व संबंधित शेतकरी बंधू, अडते, व्यापारी, हमाल व सामान्य नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी केले आहे.

तसेच शेतकरी बंधूंनी दिनांक 22 ते 24 मेपर्यंत बाजार समितीत माल विक्रीसाठी आणू नये,

असेही सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.