Published On : Thu, Mar 7th, 2019

‘लिहून घ्या… महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होत नाही’- मुख्यमंत्री

Advertisement

आज रात्री विधानसभा बरखास्तीचा निर्णय होणार, हे वृत्त निराधार – देवेंद्र फडणवीस

नागपूर: महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री घेण्यात येईल आणि लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक होईल, अशी चर्चा आज सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरुन बरेच तर्कवितर्कही लढवले जाताहेत. परंतु, हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे म्हटलं. महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही हे लिहून घ्या, अशा शब्दांत त्यांनी या चर्चेवर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. लोकसभेसोबत विधानसभेची निवडणूक घेतली जाईल, असे दावे गेल्या काही दिवसांपासून केले जात होते. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी राज्यात मुदतपूर्व निवडणूक होणार असल्याची विधानं केली होती.

Advertisement

महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री दिल्लीत होणाऱ्या उच्चस्तरीय समितीकडून घेतला जाईल, अशी जोरदार आज सकाळपासून सुरू होती. त्यामुळे दोन्ही निवडणुका एकत्र होणार का, याबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र ही चर्चा संपूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी असाच दावा केला होता. 28 फेब्रुवारीला विधानसभेचं अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील, असं चव्हाण म्हणाले होते. यावेळी त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनादेखील दिल्या होत्या. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी चव्हाण यांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं होतं.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement