Published On : Sat, Jun 8th, 2019

लोईया हाईस्कूल सर्वाधिक निकालाची परंपरा कायम

कामठी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा द्वारे घोषित दहावीच्या निकालात स्थानिक सेठ रामनाथ लोईया हाईस्कूल व ज्युनियर काॅलेज ने गत अनेक वर्षांपासून सतत सर्वाधिक निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. उल्लेखनीय आहे की, गत अनेक वर्षांपासून या संस्थेचा दहावी आणि बारावी दोन्हीचा निकाल संपूर्ण कामठी तालुक्यात सर्वाधिक राहत आलेला आहे. यावर्षी ही निकाल 96.77 टक्के आहे.

या वर्षीच्या निकालात विद्यालयाची कु श्रृतिका विनोद बन्सोड 91.00 टक्के अंक अर्जित करून प्रथम, धिरज हिरालाल देवांगन 88.60 टक्के अंक मिळवून दुसरा तथा कार्तिकेय सुनिल इंगोले 85.00 टक्के अंक मिळवून तिसरा क्रमांक पटकवला आहे. विद्यालयाचे जवळपास सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झाले आहे.

नर्सरी ते ज्युनियर काॅलेज पर्यंत शिक्षण असलेल्या शहरातील या एकमेव शिक्षण संस्थेच्या निरंतर प्रगती करीता विविध समाजिक संस्थांनी, पालक व विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष बनवारीजी लोईया, प्राचार्य रविकांत डुमरे यांच्या नेतृत्वात शिक्षक श्रीमती एन.ए.कुकडे, व्ही. एस. भोगे, श्री. आर.पी.पाठक, श्रीमती एम.पी.भोयर, श्री.पी.एन.यादव, बी.एस.शरण, सी.टी.मुटे, एस.पी.चिमूरकर,एम.एस.चाफले, वाय.एस.नाईक, सुनिल सरोदे, रमाशंकर चौबे, राजेंद्र गजभिए, सुदाम इंगोले, सविता चौरसिया, शबाना खान, आलिया जबीन, पूनम यादव, नलीनी भर्रे, हिवसे, पुष्पलता प्रधान, पूनम रायकवार, पूनमबाई, नेहाबाई व गिरीबाई चे अभिनंदन केले आहे.


– संदीप कांबळे कामठी