Published On : Mon, Oct 22nd, 2018

समाजकार्याचा वसा घेत बबनराव फेडताहेत गावाचे ऋण – टेकाडी भुमीपुत्र

कन्हान : – स्व.लक्ष्मीबाई भगवान वासाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लक्ष्मीबाई बहुउद्देशीय संस्था नागपूर चे संचालक बबनराव वासाडे यांच्याद्वारे स्वरकमेतून, स्वखर्चातून टेकाडी गावातील अंत्यत गरीब कुटुंबातील कुटुंब प्रमुखांच्या नावाने मोफत गॅस कनेक्शन वितरण करून समाजकार्याचा वसा घेत टेकाडीचे भुमिपुत्र बबनराव फेडताहेत गावाचे ऋण.

हनुमान मंदिर टेकाडी येथे सायंकाळी ६ वाजता स्व.लक्ष्मीबाई भगवान वासाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भुमिपुृत्र बबनराव वासाडे व्दारे सरपंच सौ सुनिता मेेश्राम यांच्या अध्यक्षेत विशेष अतिथी जि प नागपूर उपाध्यक्ष श्री.शरदजी डोनेकर, राष्टीय आदर्श महाविद्यालय रामटेकचे उपप्राचार्य श्री.पुरुषोत्तमजी बेले,श्रीकृष्ण मंदिर पंचकमेटी टेकाडी चे संस्थापक अध्यक्ष , गोपीचंदजी कुरडकर, सद्विचार मंचचे अध्यक्ष, प्रकाशक वर्माजी, ग्रा.प सदस्य धनीरामजी राऊत,समाजसेवी पृथ्वीराज मेश्राम, मारोती देवस्थानचे अध्यक्ष पंढरीजी बालबुधे,पत्रकार सतीश घारड प्रतिष्ठित नागरिक देवेंद्रजी सेंगर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत टेकाडी गावातील प्रथम ला़भार्थी सौ वालदे यांना मोफत गॅस शेगडीचे बबनराव वासाडे यांच्या शुभ हस्ते वितरण करण्यात आले.

या उपक्रमात अंत्यत गरीब कुटुंबाना प्रत्येक महिन्याला प्रत्येकी १ या क्रमानुसार एकूण २१ गॅस शेगडी कनेक्शन विकत घेऊन वितरण करण्यात येईल. या कार्यक्रमात लहान मुलांच्या हस्ते ड्रॉ काढण्यात आला. लक्ष्मीबाई संस्था कुठलेही सरकारी अनुदान घेत नसून संस्थापक स्वतः च्या नौकरी करून आलेल्या कमाईतून हे कार्य निरहेतुक पणे समाजसेवा म्हणून करीत आहेत याप्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.”शरद डोनेकर यांनी आपल्या संबोधनात दुसरा कुठलाही आधार नसंतांनाही केवळ गावाचे ,समाजाचे ऋण फेडायचे आहे,सामाजिक बांधिलकी जपायची आहे ,गावासाठी काही करायचे आहे. समाजबांधवांची प्रगती करायची आहे. या निरहेतुक उद्देशाने कोणताही पारिवारिक,राजकीय आधार, वारसा नसतांना टेकाडी गावासाठी बबनराव स्वखर्चातून करीत असलेलं हे पहिलं महादान कार्य आहे. असे मार्गदर्शनात सागितले . कार्यक्रमाचे उत्तम संचालन सुनील लाडेकर यांनी तर आभार किशोर वासाडे यांनी मानले.

याप्रसंगी टेकाडी गावातील ग्रामपंचायत सदस्य,वासाडे परिवारातील सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. स्व. लक्ष्मीबाई भगवान वासाडे बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक श्री बबनराव भगवान वासाडे जन्म १५ नोव्हेंबर १९६२ जन्मगाव टेकाडी हे भारतीय सैनिक म्हणुन २२ ऑगस्ट १९८५ ला नियुक्ती, हवालदार लिपिक पदावर सप्टेंबर २००१ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय केला. त्यानंतर आदिवासी विभाग नागभीड चंद्रपूर येथे डिसेंबर २००५ ते ऑक्टोबर २००८ पर्यंत नौकरी केली. तद्नंतर त्यांना गृह मंत्रालय भारत सरकार भारतीय विमान प्राधिकरण विभागातील इंटेलिजन्स ब्युरो डिपार्टमेंट मध्ये इंटेलिजन्स इमिग्रेशन ऑफिस ऑफिसर या पदावर त्यांची नियुक्ती झाली.

परंतु विद्यार्थी दशेपासूनच त्यांना समाजसेवेची तळमळ होती.विज्ञान स्नातकतुन महाविद्यालयिन शिक्षण घेतल्यानंतर त्यांनि देश सेवा करण्याचा निर्णय घेतला त्यांना भारतीय थलसेनेत सैनिक पदावर नौकरी मिळाली.तिथे असतांना ते दोन विषयात एम ए (भारतीय इतिहास, समाजशास्त्र) झाले, परंतु गाव सोडून गेल्यानंतर देशाची सेवा सुरू असतांना ही त्यांना ही गावाची सेवा,गावाचे स्वतःवर असलेले ऋण ,ही कल्पना ही तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती,त्या दरम्यान मधल्या काळात त्यांनी भारतीय अध्यात्मिक साहित्य व कविता यावर १२ पुस्तके लिहिली असून ५ प्रकाशित व ७ आगामी प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.त्यांचा कविता संग्रह “आसवांची ओंजळ ” हा महाराष्ट्र राज्य संस्कृती साहित्य मंडळाने प्रकाशित केलेला आहे.

ते उत्तम कवी, नाटककार, लेखक, उत्तम चित्रकार व निवेदक असून नौकरी, प्रपंच एवढा व्याप सांभाळून आपल्या अंतरंगात, मनात, हृदयात असलेला समाजसेवेचा वसा जपण्याचे कार्य करीत आहेत.आपण ज्या मातीत ,ज्या समाजात जन्म घेतला त्या मातीचे ऋण फेडावे लागते या आशयातून त्यांनी गावातील गरिबांची सेवा करून गावाचे अर्थात समाजाचे आपल्यावर असलेले ऋण स्वतःच्या केलेल्या कमाईतून फेडण्याचा लोकसेवेच्या माध्यमातून दृढनिश्चय केला असून त्या अनुषंगाने त्यांचे कार्य असून त्याचाच एक भाग म्हणून दसऱ्याच्या पावन मुहूर्तावर या कार्याची गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन निशुल्क वितरित करून मुहूर्तमेढ करण्यात आली.