Published On : Mon, Oct 29th, 2018

बुधवारी वीज पुरवठा बंद राहणार

नागपूर: अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी महावितरणच्या काँग्रेस नगर विभागात विविध ठिकाणी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सकाळी ८ ते ११ या वेळेत लोकमत चौक, यशवंत स्टेडियम,वर्धा रोड, श्रीराम भवन, विद्यापीठ ग्रंथालय, सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सावरकर नगर,दंतेश्वरी,देव नगर,सुरेंद्र नगर, एलआईसी कॉलनी, नेहरू नगर,संताजी कॉलेज परिसर,विकास नगर,सुभाष नगर,तुकडोजी नगर,कामगार कॉलनी, नाईक ले आऊट, शास्त्री ले आऊट,अध्यापक कॉलनी, जयताळा,डीआईजी. वायरलेस, चंदनशेष नगर,कृष्णन नगरी,नरसाळा येथील वीज पुरवठा बंद राहील.

सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत अमरावती रोड येथील तेलंगखेडी मरारटोली, रामनगर परिसर,इंद्रप्रस्थ कॉलनी,पाटील ले आऊट, भेंडे ले आऊट, पन्नास ले आऊट, सोनेगाव वस्ती, सहकार नगर,गजानन धाम,जयप्रकाश नगर,चिंतामणी नगर,राजीव नगर,तपोवन कॉम्प्लेक्स,राहुल नगर,नरकेसरी ले आऊट, शाम नगर,पॅराडाइस सोसायटी, सोमलवाडा,राजीव नगर,सावित्री नगर,मुळक कॉम्प्लेक्स,विदर्भ प्रीमियर सोसायटी,आयटी पार्क,त्रिमूर्ती नगर,स्वागत सोसायटी,जयबद्रीनाथ सोसायटी,संघर्ष नगर,शारदा नगर,कबीर नगर,रमाबाई आंबेडकर सोसायटी,प्रज्ञा ले आऊट, दाते ले आऊट सकाळी ८ते दुपारी १२ या वेळेत खड्गाव,लावा, सोनबा नगर, सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत वेणा पाणी पुरवठा योजना,जवाहरलाल नेहरू ऍल्युमिनिअम रिसर्च सेन्टर येथील वीज पुरवठा बंद राहील.