Published On : Mon, Sep 16th, 2019

शहरातील साहित्यिकांचे साहित्य होणार मनपाच्या वाचनालयातून उपलब्ध

राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त मनपाचा पुढाकार : १९ साहित्यिकांनी केली साहित्य सुपूर्द

नागपूर : शहरातील हिंदी साहित्यिकांचे साहित्य मनपाच्या ग्रंथालयामध्ये वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून सोमवारी (ता.१६) शहरातील १९ साहित्यकारांनी आपली १७९ साहित्य महापौर नंदा जिचकार यांच्याकडू सुपूर्द केली.

मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. यावेळी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती तारा (लक्ष्मी) यादव, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका रूपा राय, नगरसेविका भावना लोणारे, निगम सचिव हरीश दुबे, ग्रंथालय अधीक्षक अलका गावंडे यांच्यासह शहरातील साहित्यिक ओम प्रकाश शिव, नरेंद्र परिहार, डॉ.शशी वर्धन शर्मा शैलेश, सुधा काशिव, मधु शुक्ला, मीरा रामकवार, डॉ.रमेश गांधी, डॉ.कल्पना शर्मा, प्रभा मेहता, कृष्ण कुमार ‍द्विवेदी, डॉ.बालकृष्ण महाजन, विदीशा शर्मा, गुरूप्रताप शर्मा, प्रा.रवी कोलते, माधुरी राउळकर तसेच शंकर विटनकर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवर साहित्यिकांनी आपले साहित्य मनपाच्या ग्रंथालयातून वाचकांना उपलब्ध करुन देण्यासाठी महापौर नंदा जिचकार यांच्याकडे सुपूर्द केले.

मराठी साहित्यिकांच्या साहित्यांनाही मिळणार व्यासपीठ : महापौर नंदा जिचकार
राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या पुढाकारातून शहरातील साहित्यिकांच्या साहित्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आज वाचणा-यांची संख्या कमी झाली अशी ओरड होत असली तरी सर्वांपर्यंत साहित्य पोहोचविण्याची गरज आहे. वाचनाने विचार करण्याची क्षमता वृद्धींगत होते. त्यामुळे प्रत्येकाने वाचन करणे आवश्यक आहे. मनपातील वाचनालयामधून शहरातील प्रसिद्ध साहित्यिकांच्या रचना, त्यांच्या कविता, लेखन जनतेपर्यंत पोहोचून साहित्यिकारांच्या साहित्यांना व्यासपीठ मिळणार आहेत. राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त शहरातील हिंदी साहित्यिकांचे साहित्य मनपा वाचनालयातून वाचकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. तर लवकरच मराठी साहित्यिकांचेही साहित्य मनपाच्या ग्रंथालयातून वाचकांपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी सांगितले.

नरेंद्र परिहार यांनी सर्व साहित्यिकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. मनपाने घेतलेला पुढाकार अभिनंदनीय असून पुढील वर्षीपर्यंत ५१ साहित्यिक मनपाकडे आपले साहित्य सुपूर्द करतील व पुढे ही संख्या वाढत राहिल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले तर आभार निगम सचिव हरीश दुबे यांनी मानले.