Published On : Sat, Nov 9th, 2019

नागपुरात मद्यवाहतूक करणाऱ्यांना चारचाकीसह अटक

Advertisement

नागपूर : विदर्भातील गडचिरोली, चंद्र्रपूर व वर्धा या जिल्ह्यात मद्य विक्रीस बंदी असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुटीबोरी ते जाम मार्गावरील बामणी येथे केलेल्या कार्यवाहीत १२ लाख ५८ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाहनचालक सुदर्शन राजू किन्नाके, हिंगणघाट याच्या ताब्यातील चारचाकी वाहनातून देशी व विदेशी मद्याच्या १५१ पेट्या जप्त करण्यात आल्या असून, सोबत असलेला अक्षय राजू ऊबरकर, हिंगणघाट त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा चे कलम ६५ (ए), (ई), ८१ व ८३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Advertisement

तसेच चारचाकी वाहन मालक आकाश प्रकाश तुराळे रा. उबदा, समुद्रपूर, याने गुन्ह्याची कबुली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात येऊन दिली असता त्यालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुहास दळवी, उपनिरीक्षक विशाल कोल्हे, धनराज राऊत, जवान प्रकाश मानकर, अंकुश भोकरे, प्रशांत घावळे व विनोद डुंबरे यांनी केली. तर अधिक तपासणी निरीक्षक सुहास दळवी करीत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement