Published On : Sat, Sep 9th, 2017

महानगरपालिका व जेसीसतर्फे 2500 बांधकाम मजुरांचे लसिकरण

नागपूर: नागपूर महानगरपालिका व जेसीस नागपूर गोंडवाना झोन 9 यांच्या संयुक्त विद्यमाने 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान सुमारे 2 हजार 500 बांधकाम क्षेत्रातील कार्यरत मजुरांना टीटनेसचे लसिकरण कऱण्यात आले. तीन दिवसीय उपक्रमाचे समारोप आज (ता. 9) सप्टेंबर रोजी प्रतापनगर चौक येथे महापौर नंदा जिचकार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी मनपातर्फे नोडल अधिकारी सुनिल घुरडे, नगरसेविका पल्लवी शामकुळे, मिनाक्षी तेलगोटे, वैद्यकीय अधिकारी विजय जोशी, डॉ. मंजुशा मठपती, जेसीआय झोन 9 चे अध्यक्ष सीए स्वास्तिक जैन, माजी अध्यक्ष नितीन ठक्कर, जेसीआय़ नागपूर गोंडवाना अध्यक्ष कविता दुरुगकर, विक प्रेसिडेंट वृंदेश धर्माधिकारी, प्रकल्प संचालक संजय गुलकरी, प्रकल्प समन्वयक प्रबोध देशपांडे, जेसीआय विक सचिव अर्पण काटकवार यांची उपस्थिती होती.

उपक्रमादरम्य़ान शहरातील विविध भागात असलेल्या बांधकाम मजुरांच्या ठिय्यावर जाऊन त्यांचे लसिकरण करण्यात आले. तसेच त्यांच्या आरोग्याची तपासणी कऱण्यात आली. यामध्ये गजानननगर, जरीपटका, महाल, मानेवाडा, प्रतापनगर, पंचशील चौक, भांडे प्लॉट आणि प्रतापनगर येथील ठिय्यावर मजुरांचे लसिकऱण करण्यात आले. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन विविध घटकांची काळजी घेणे, आणि त्यांच्यासाठी उपक्रमाचे आयोजन करणे ही अभिनंदनाची बाब आहे. प्रत्येक सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन उपक्रम राबविल्यास निरोगी आणि स्वास्थ समाज साकारणे सहज शक्य असल्याचे सांगून जेसीसचे कौतुक केले.